मुंबई, 21 सप्टेंबर : सण असो अथवा राजकीय सभा असो पोलीस आपली ड्युटी चोखपणे पार पाडत असतात. पण, पोलिसांच्या वर्दीवरच काही महाभाग हात उचलण्याच्या घटना घडत आहे. मुंबईतील (mumbai ) मालाडमध्ये (malad) तृतीयपंथीयांनी (transgender ) पोलिसांना (mumbai police) मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबईतील मालाड परिसरात तृतीयपंथीयांची अरेरावी आणि गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी दुपारी काही तृतीयपंथीयांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली. तसंच वाहतूक पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.
हे तृतीयपंथी एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी एका पोलिसांसोबत गैरव्यवहार सुद्धा केला. कपडे काढून या तृतीयपंथीयांनी पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी बांगुर पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात कलम 353,332,188,51 NDMA अॅक्ट आणि 34 सह गुन्हे दाखल केले आहे.
पाकिस्तानची मोठी नाचक्की! न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द
बांगुर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीचालकाने रिक्षाला धडक दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. तिथे उभ्या असलेल्या काही तृतीयपंथीयांनी रिक्षाचालकाची बाजू घेतली आणि दुचाकीस्वाराला मारहाण सुरू केली. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, तृतीयपंथीयांनी पोलिसांवरच हल्ला केला.
पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.