Home /News /mumbai /

आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल; पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये प्रवेश, VIDEO समोर

आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल; पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये प्रवेश, VIDEO समोर

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहीटमध्ये (Shivsena MLA) दाखल झाले आहे. पोलीस बंदोबस्तात 2 वाहनं हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

    गुवाहाटी 23 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहीटमध्ये (Shivsena MLA) दाखल झाले आहे. पोलीस बंदोबस्तात 2 वाहनं हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या 3 आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, हे तीन आमदार नेमके कोण आहेत हे समोर येऊ शकलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ; आसामाचे CM घेणार भेट दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांच मनपरिवर्तन होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर शिवसेनेच्या बंडेखोर आमदारांच्या बंदोबसत्ता मोठी वाढ करण्यात आली आहे. हॉटेल रेडीसन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिसवा सरमा हे बंडखोर आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आमदारांचं मनपरिवर्तन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mla, Shivsena

    पुढील बातम्या