Home /News /mumbai /

"3 कोटी द्या, वडिलांचा जामीन करुन देतो" म्हणणाऱ्याच्या विरोधात नवाब मलिकांच्या मुलाची पोलिसांत तक्रार

"3 कोटी द्या, वडिलांचा जामीन करुन देतो" म्हणणाऱ्याच्या विरोधात नवाब मलिकांच्या मुलाची पोलिसांत तक्रार

Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन खरेदी प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली आहे.

    मुंबई, 17 मार्च : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मात्र, आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नवाब मलिकांचा जामीन हवा असल्यास 3 कोटी रुपये द्या अशी मागणी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. नवाब मलिकांच्या मुलाने या संदर्भात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्या मुलाने मुंबईतील विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. इम्तियाज नावाच्या अज्ञात व्यक्तीने नवाब मलिकांच्या जामीनासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कुर्ल्यातील जमिनीच्या व्यवहारात ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी आरोपी इम्तियाज याने तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचं बोललं जात आहे. वाचा : गोवा जिंकल्यानंतर फडणवीस नागपुरात,महाराष्ट्रातील राजकारणाबाबत वर्तवलं मोठं भाकित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बिटकॉईनच्या स्वरूपात तीन कोटी रुपयांची मागणी (demand of 3 crore rupees in source of bitcoin) केली होती. या प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला इम्तियाज नावाचा व्यक्ती कॉल करत होता. त्यानंतर नवाब मलिकांच्या मुलाने विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा फोन कॉल दुबईहून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एबीपी न्यूज ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. नवाब मलिक यांना मोठा झटका, ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका फेटाळली आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे. वाचा : 'तो' निर्णय खरोखर राज्यपालांकडून रद्द? राजभवनाने दिली महत्त्वाची माहिती नवाब मलिकांच्या या याचिकेवर ईडीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आणि पीएमएलएचा कायदा लागू होतो असं ईडीने म्हटलं. त्यानंतर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला. तसेच नवाब मलिकांना जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: ED, Mumbai police, Nawab malik

    पुढील बातम्या