मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'24 कॅरेटची शिवसेना बदलली' म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना अनिल परबांचा टोला, म्हणाले 'राजकारणी आहात कॅरेट तपासत बसू नका'

'24 कॅरेटची शिवसेना बदलली' म्हणणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना अनिल परबांचा टोला, म्हणाले 'राजकारणी आहात कॅरेट तपासत बसू नका'

'24 कॅरेटची शिवसेना बदलली' म्हणणाऱ्या मुनगंटीवारांना अनिल पराबांचा टोला, म्हणाले 'कॅरेट तपासत बसू नका'

'24 कॅरेटची शिवसेना बदलली' म्हणणाऱ्या मुनगंटीवारांना अनिल पराबांचा टोला, म्हणाले 'कॅरेट तपासत बसू नका'

Anil Parab on Sudhir Munghantiwar: 'सुधीर मुनगंटीवार सोनार झाले का? कॅरेट तपासत बसू नका' अनिल परबांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला

मुंबई, 16 नोव्हेंबर : शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना पहायला मिळत आहेत. आज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटलं, आत्ताची शिवसेनेचा 24 कॅरेटची राहिलेली नाहीये. भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या या विधानानंतर त्याला शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (24 carat shiv sena now changed said Sudhir Mungantiwar)

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, महाराष्ट्राच्या विविध विषयांवर चिंतन व्हावं, राज्याची आर्थिक प्रगती व्हावी यापेक्षा राजकारण करण्यात राज्यकर्ते गुंतलेले आहेत. बाळासाहेबांच्या 24 कॅरेट हिंदुत्वाच्या पक्षाला मतदान केले. आता ती शिवसेना राहिलेली नाहीये. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न हिंदुत्वाचं होतं मुख्यमंत्री होण्याचं कधीच नव्हतं.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, 1960 नंतरचे सर्वात निकम्मे हे सरकार आहे. शेतकरी सन्मान योजनेचे महिलांचे दिव्यांगाचे पैसे दिले नाही. या सरकारमध्ये स्मशान शांतता आहे. सगळीकडे सामसूम आहे. अतिशय निम्न स्तरावर राजकारण सुरू आहे. आपण काय बोलतो यांचे भान राहीले नाही. राज्याचे गृहमंत्री राहिलेले जेलमध्ये, पोलीस आयुक्त फरार असे चित्र कधीच महाराष्ट्राने पाहीले नव्हते.

वाचा : प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार

मुनगंटीवारांना अनिल परबांचे प्रत्युत्तर

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवारांनी सोनारांचा धंदा कधी सुरू केला? ते राजकारणी आहेत. कॅरेट तपासत बसू नये असं म्हणत अनिल परब यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - अनिल परब

अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटलं, हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचाऱ्यांनी आपले मत मांडावे असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची पाच वाजता बैठक होत आहे. या बैठीकीनंतर एक अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा.

एसटी कर्मचाऱ्यांच्या 28 युनियनच्या कृती समितीसोबत मी चर्चा केलीय. मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. बोलणी करायला येतात व जातात. पण ते परत येत नाहीत. एसटी बंद झाल्याने अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळं एसटी बंद करू नका. हे परवडणारे नाही. विलिनीकरण मागणीवर तुर्तास पर्याय नाही. आम्ही तुमचे वैरी नाहीयेत असंही अनिल परब म्हणाले.

First published:

Tags: Anil parab, Shiv sena, Sudhir mungantiwar