तिला करायचा होता प्रेमविवाह, आई-भावाने ओढणीने आवळला गळा

तिला करायचा होता प्रेमविवाह, आई-भावाने ओढणीने आवळला गळा

निर्मलाचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला प्रेमविवाह करायचा होता..

  • Share this:

मुंबई,19 नोव्हेंबर: 23 वर्षीय तरुणीची तिची जन्मदाती आई आणि पाठराख्या भावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या झाली आहे. पायधुनी येथे रविवारी ही घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, निर्मला वाघेला असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. निर्मलाचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. त्याच्यासोबत तिला प्रेमविवाह करायचा होता. मात्र, याबाबत तिची आई आणि भावाला कुणकुण लागली होती. त्यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. निर्मला आपल्या निर्णयावर ठाम होती. ती घरातून पळून जाण्याच्या बेतात असताना तिला आई आणि भावाने अडवले. तिला बेदम मारहाण केली. तरीही ती ऐकत नसल्याने दोघांनी ओढणीने तिचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. निर्मला वाघेला हिच्या हत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी आरोपी आई शालू वाघेला आणि भाऊ पप्पू वाघेला याला अटक केली आहे.

चारित्र्यावरून संशय.. मित्राच्या मदतीने पतीने केला पत्नीचा खून

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राच्या मदतीने पत्नीचा खून करण्यात आला आहे. आरोपी पतीने अपघाताचा बनाव करून अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याचे आधी भासवले. मात्र अवघ्या 12 तासांत पोलिसांनी या बनवेगिरीचा पर्दाफाश केला.

मिळालेली माहिती अशी की, आष्टी येथील या घटनेत खुनाचा कट रचणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हाची नोंद करण्यात आली. सोनाली नितीन आवारे (साप्ते) असे मृत महिलेच नाव आहे. तर पती नितीन आवारे (साप्ते) व भाऊसाहेब धोंडे अशी आरोपींची नावे आहेत.

आष्टी शहरातील सोनाली आवारे (साप्ते) यांचा रविवारी सायंकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. परंतु, पोलिसांना घातपाताचा संशय होता. हा अपघात नसल्याचा पोलिसांचा कयास होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात खोलवर जाऊन तपास केला. चौकशीत पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून संशयाची सुई सोनालीचा पती नितीनकडे गेली. अधिक चौकशीत पती, पत्नीत सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नितीनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मित्र भाऊसाहेब धोंडे याच्या मदतीने आपण पत्नी सोनालीच्या खुनाची कबुली दिली. मुलगी प्रगती संदेश मुळीक हिच्या तक्रारीवरून नितीन आवारे व भाऊसाहेब धोंडे यांच्यावर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद केला.

अतिशय नियोजनबद्धरित्या हा प्लॅन ठरला होता. अपघाताचा बनावही यशस्वी करण्याचे ठरले होते. याची जबाबदारी भाऊसाहेब धोंडेने घेतली होती. त्यानेच अपघाताचा बनाव करून रविवारी सायंकाळी थेट पोलिस ठाणे गाठले व आपल्या हातून अपघात झाला असून त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: November 19, 2019, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading