Home /News /mumbai /

कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत राज्य सरकारचा मोठा प्लॅन, 'हा' घेतला निर्णय

कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत राज्य सरकारचा मोठा प्लॅन, 'हा' घेतला निर्णय

मुंबईत भविष्यात रुग्णांची संख्या अधिक वाढली तर पर्यायी व्यवस्था म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणच्या इमारतींमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई, 20 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्याची राजधानी मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत विलगीकरण कक्षाची वाढ करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. मुंबई रुग्णांची संख्या वाढत असताना सर्वत्र पसरत असलेल्या या संकटावर मात करण्यासाठी वेगवेगळे हॉटेल्स मैदान अशा ठिकाणी भविष्याची तरतूद म्हणून विलगीकरण तसंच रुग्णांसाठी बेड्स तयार केले जात आहेत. मुंबई एनएससीआय, रेस कोर्स, यासह वेगवेगळ्या ठिकाणीदेखील 500 ते 2000 च्या आसपास बेड्सची तयारी केली गेली आहे. हेही वाचा -पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला, एका दिवसात 10 जणांचा मृत्यू मुंबईत भविष्यात रुग्णांची संख्या अधिक वाढली तर पर्यायी व्यवस्था म्हणून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) यांनी देखील तयार असलेल्या इमारती या रुग्णांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेच्या ताब्यात दिल्या आहेत. चेंबूर, अंधेरी, गोरेगाव, मुलुंड अशा वेगवेगळ्या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या 20 पेक्षा जास्त मजल्यांच्या अनेक इमारती तयार असून साधारणपणे मुंबई परिसरात 2008 फ्लॅट्स तयार झाले आहेत. सध्या ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं ही सौम्य प्रमाणात आहे किंवा लक्षणं विरहीत आहेत, अशा रुग्णांना या इमारतीमध्ये विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी दिली. हेही वाचा -आता Mask च करणार कोरोनाचा नाश; व्हायरस पृष्ठभागावर येताच रंग बदलणार SRA च्या इमारतीत रुग्णांच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारती आधीच बांधून तयार असल्यामुळे फ्लॅट्स वापर हा विलगीकरण करण्यासाठी केला जाणार आहे. मुंबईतील ज्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा भागातील ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षण सौम्य प्रमाणात आहे अशांना या इमारतीमध्ये विलगीकरण करण्यात येणार आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या