2008 मालेगाव बाँबस्फोट प्रकरण : कर्नल पुरोहितसह अन्य 6 जणांवर आरोप निश्चित

2008 मालेगाव बाँबस्फोट प्रकरण : कर्नल पुरोहितसह अन्य 6 जणांवर आरोप निश्चित

मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी अखेर 7 जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी अखेर 7 जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर 5 जणांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, ‘या सर्व जणांवर अभिनव भारत संघटनेद्वारे दहशत पसरवण्यासाठी कट करणे आणि 29 सप्टेंबरला झालेल्या घटनेत समावेश असल्याचा आरोप आहे. हे कृत्य दहशतवादामध्ये येतं.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने या आरोपींना जामीन मंजूर करत दिलासा दिला होता. आता कोर्टाने 7 जणांवर आरोप निश्चित केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आता या प्रकरणात आरोपींच्या शिक्षेसाठी 2 नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.

मोक्कातून सुटका पण आरोप कायम

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 27 डिसेंबर २०१७ रोजी आरोपनिश्चीती केली होती. परंतु, यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवला होता.

पुरोहित आणि साध्वी यांच्यावर यूएपीए कलम 17, 20 आणि 13 हटवण्यात आले. तसंच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटका केली.

परंतु, असं असलं तरीही UAPA चं कलम १८ तसंच प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रसाद पुरोहित यांच्यावर आयपीसीच्या अंतर्गत 120 B , 302, 307, 304, 326 , 427 153 A खटला सुरू होता. यात गुन्हेगारी कट रचणे आणि खुनाचे आरोप ठेवण्यात आले . महत्वाचं म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह यांना आपल्या मोटरसायकलीचा वापर कशासाठी केला जातोय याची पूर्ण कल्पना असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.

जामीनावर सुटका

२१ आॅगस्ट २०७ रोजी सुप्रीम कोर्टाने कर्नल पुरोहितला मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला होता. त्यामुळे 9 वर्षं तुरुंगात असलेले कर्नल पुरोहितची सुटका झाली होती. तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुरोहित लष्कराच्या सेवेत रूजू झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 02:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading