मुंबई, 27 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (20 years old woman rape and brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी बंद पडलेल्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर आरोपींनी तिची निर्घृण हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा मृतदेह कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाऊंडमधील बंद इमरातीच्या टेरेसवरील (Dead body found on terrace) लिफ्ट रुममध्ये आढळला आहे. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असावी, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपासाला वेग दिला आहे.
हेही वाचा-मैत्रिणींसमोर 'चरसी' म्हटल्यानं कॉलेज विद्यार्थ्याला मारहाण; तरुणानं संपवलं जीवन
कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊंडमधील संबंधित इमारत मागील बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. याठिकाणी फारशी लोकांची ये-जा नसते. पण अलीकडेच 18 वर्षीय तरुण आपल्या अन्य दोन मित्रांसह संबंधित इमारतीत इन्स्टाग्राम रिल्स तयार करण्यासाठी गेला होता. त्यावेळी इमरातीच्या टेरेसवर असणाऱ्या लिफ्ट रुममध्ये या तरुणीचा मृतदेह आढळला आहे.
हेही वाचा-पतीच्या निधनानंतर FBवरील तरुणानं दाखवली सुखी संसाराची स्वप्न पण..; बीडमधील घटना
हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच, तरुणांनी तातडीने या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृत तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. पोलीस या घटनेचा पंचनामा करत आहेत. विशेष म्हणजे अलीकडेच एचडीआयएल कॉलनीत परिसरातील झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. त्यामुळे मृत तरुणी नेमकी कोण? याचा तपास करणं पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Murder Mystery, Rape