Home /News /mumbai /

Mumbai: हॉटेलात डांबून शरीराचे रोज व्हायचे सौदे, 20 वर्षीय तरुणीची व्यथा ऐकून पोलीसही सुन्न

Mumbai: हॉटेलात डांबून शरीराचे रोज व्हायचे सौदे, 20 वर्षीय तरुणीची व्यथा ऐकून पोलीसही सुन्न

Crime in Mumbai: एका वीस वर्षीय तरुणीला दलालांनी एका हॉटेलात डांबून (detain in hotel) तिच्याकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर: एका वीस वर्षीय तरुणीला दलालांनी एका हॉटेलात डांबून (detain in hotel) तिच्याकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला मुंबईतील (Mumbai) नागपाडा (nagpada) परिसरातील एका हॉटेलमध्ये डांबलं होतं. तू बांगलादेशी असून तुला कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून नराधम आरोपी तिच्या शरीराचे सौदे करत होता. गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर, अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली (One arrested) असून पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पीडित तरुणी मूळची बांगलादेशातील दादरा गावातील रहिवासी आहे. पीडित तरुणी सात वर्षांची असताना, तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. वडिलांनी अन्य एका तरुणीशी लग्न करून पीडित मुलीला वाऱ्यावर सोडलं होतं. यामुळे पीडितेच्या आजीनं अवघ्या चौदाव्या वर्षी पीडितेचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर लगेच सोळाव्या वर्षी पीडित तरुणी आई बनली. हेही वाचा-मित्र पत्नीवर करायचे रेप अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार पण पीडितेच्या पतीचं अन्य एका तरुणीशी प्रेमसंबध असल्याने त्यानेही पीडितेचा सांभाळ करणं बंद केलं. अशात मुलीचं संगोपन करण्यासाठी तरुणीनं ढाका येथे अनेक ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही महिलांनी चांगले पैसे मिळतील, असं सांगून तिला कोलकाता याठिकाणी आणलं. भारतात आल्यानंतर निराधार तरुणीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं. याठिकाणी दोन वर्षे वास्तव्य केल्यानंतर, संबंधित तरुणी मुंबईला आहे. हेही वाचा- नात्याला काळिमा! विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, साताऱ्यात दिराचा वहिनीवर बलात्कार याठिकाणी गेल्यानंतर सोनु कुमार नावाच्या दलालाने तिला नागपाडा येथील एका हॉटेलात डांबून ठेवलं. तू बांगलादेशी आहेस, तुला कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखवून आरोपीनं रोज तिच्या शरीराचे सौदे करत तिला नरक यातना दिल्या. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून आरोपी तिला नरक यातना देत होता. अखेर 9 डिसेंबर रोजी पीडित तरुणी डी बी रोड पोलीस ठाणे गाठत, तिच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा मांडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या