IIT मुंबईत 20 विद्यार्थ्यांना कोरोना तर 60 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

IIT मुंबईत 20 विद्यार्थ्यांना कोरोना तर 60 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

खबरदारीचा उपाय म्हणून आयआयटीच्या कॅम्पसमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.

  • Share this:

सुस्मिता भदाणे पाटील, प्रतिनिधी मुंबई

मुंबई, 14 एप्रिल: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ आहे त्यातच आता आयआयटी मुंबईतील 20 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे (आयआयटी-बी) दोन आठवड्यांपूर्वी कॅम्पसमध्ये 75  कोरोना बाधित आढळले होते.  सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 60 इतकी आहे.

आयआयटी मुंबईतील कॅम्पस रूग्णालय गेल्या आठवड्यात पूर्ण भरले होते, यामुळे पर्यायी व्यवस्था करून काही कोरोना बाधितांना  त्यानंतर हाॅस्टेल बिल्डींग 16सीमध्ये तर काही विद्यार्थ्यांना होमआयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. सध्या आयआयटीतील 20 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 17 रुग्णांवर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर तीन रुग्णांवर मुंबईतील इतर रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खबरदारीचा उपाय

खबरदारीचा उपाय म्हणून आयआयटीच्या कॅम्पसमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. आयआयटीच्या परिसरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत असून इतरही उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या आयआयटीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही साधारणत: 2500 ते 3000 इतकी आहे.

वाचा: Covid vaccine: कोरोना प्रतिबंधक लसींवर चोरांचा डल्ला, सरकारी रुग्णालयातून 320 डोसची चोरी

गेली अनेक दिवस हाॅस्टेलमध्ये रूम शेअरिंग देखील बंद करण्यात आले आहे. परंतु बाहेर गावी जाऊन आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनो प्रसार वाढत असल्याच म्हटलं जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्कॅनिंग स्ट्रेसिंग टेस्टींग या सूत्राचा वापर करण्यात येत आहे. कॅम्पस परिसरात आवश्यक असेल तरच बाहेर पडण्यासाठी सूचवा देण्यात आल्या आहेत.

राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी जायचे असेल तर पालकांच्या अनुमतीने सुरक्षेच्या उपाययोजना करत मुलांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. हाॅस्टेल मेस व इतर सोयी सुविधा आयआयटीकडून येण्यात येणार आहेत. मुंबईतील कोरोना पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकीकडे नवे निर्बंध घातले जात आहेत तर दुसरीकडे रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे येत्या काळात नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

First published: April 14, 2021, 6:41 PM IST

ताज्या बातम्या