News18 Lokmat

मराठवाड्यात पावसाचं कमबॅक ; मुंबईसह राज्यातही संततधार

तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलीये. मोठ्या प्रतीक्षेनंतर वरूणराजाचं राज्यात सर्वत्र पुनरागमन झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2017 11:05 AM IST

मराठवाड्यात पावसाचं कमबॅक ; मुंबईसह राज्यातही संततधार

मुंबई, 20 ऑगस्ट : तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलीये. मोठ्या प्रतीक्षेनंतर वरूणराजाचं राज्यात सर्वत्र पुनरागमन झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय. सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झालीय. गेल्या 24 तासात सरासरी 100 मिमी पाऊस पडलाय. नांदेड शहरात तर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याच्या घरात पाणी शिरलंय. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तब्बल दीड-दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन झालं.

अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचं जोरदार कमबॅक झालंय. विशेष नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड या दुष्काळी तालुक्यांमध्ये कालपासून समाधानकारक पाऊस पडतोय. त्यामुळे सोमवारचा बैल पोळा निश्चितच उत्साहात साजरा होणार आहे. बारामती च्या जिरायती पट्ट्यात पहाटेपासून संततधार सुरूच आहे. इंदापूरमध्येही पावसाला सुरूवात झालीय, सोलापूर जिल्ह्यातही पावसाचं कमबॅक झालंय, त्यामुळे पिकांना जीवदान मिळालं असून तालुक्यामध्ये करण्यात आलेल्या ओढा खोलीकरण, सरळीकरण, यामध्ये पाणी साठण्यास सुरुवात झालीय.

मुंबई आणि उपनगरांमध्येही कालपासूनच पावसाची संततधार पुन्हा सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...