अंधेरीत तरुणीचा पाठलाग, 2 आरोपींना अटक

अंधेरीत तरुणीचा पाठलाग, 2 आरोपींना अटक

तेव्हा या युवतीनं त्यांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला आणि मुंबई पोलिसांना टॅग करत सोशल मीडियावर टाकला. आणि कंट्रोल रुमला फोन करून सगळा प्रकार सांगितला.

  • Share this:

मुंबई, 18 आॅगस्ट : दोन आठवड्यांपूर्वी एका आयटी प्रोफेशनल महिलेचा पाठलाग करण्याच्या कारणावरून अटक केल्याची घटना ताजी असतानाच अंधेरीत तरुणीचा पाठलाग केल्याची घटना घडलीये. यात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीये.

आपलं काम संपवून ही तरूणी रात्री रिक्षाने घरी निघाली होती, त्याच वेळी एका बाईकवरून दोन व्यक्ती मोठ्यानं गाणी म्हणत, विचित्र हावभाव करत आणि कमेंट करत रिक्षाच्या आजूबाजूनं जात होती. ती युवती त्यांना ओरडली,  त्यानंतर तर त्यांची ही हरकत आणखी वाढली. तेव्हा या युवतीनं त्यांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला आणि मुंबई पोलिसांना टॅग करत सोशल मीडियावर टाकला. आणि कंट्रोल रुमला फोन करून सगळा प्रकार सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी तातडीनं हलचाल करत त्या मुलीली जुहू सर्कलच्या बाजूला जायला सांगितलं. तिकडे पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. मात्र पोलिसांना बघून या दोघांनीही तिथून पळ काढला. रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतलंय.

First published: August 18, 2017, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading