मैदानात खेळत होता 2 वर्षांचा चिमुरडा, सापाने पायावर केला दंश!

मैदानात खेळत होता 2 वर्षांचा चिमुरडा, सापाने पायावर केला दंश!

सुमित सोनकांबळे देखील आपल्या आजोबासोबत खेळण्यासाठी उद्यानात गेला होता.

  • Share this:

 

नवी मुंबई, 20 फेब्रुवारी : नवी मुंबई कोपरी गावातील तलाव जवळील उद्यानमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या एका दोन वर्षाच्या मुलाचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुमित सोनकांबळे असं मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे. नवी मुंबईत मागील काही दिवसांपूर्वी सापांचा वावर वाढला आहे. त्यातील बरेच सर्प हे सर्प मित्रांनी पकडून जंगलात सोडले आहेत. कोपरी गाव सेक्टर २६ येथील तलावा जवळील उद्यानामध्ये ही सापांचा वावर अलीकडे  दिसत होता. महापालिकेने सव्वाचार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या एम्युजमेंट पार्कमध्ये आणि तलावा जवळील उद्यानात  खेळण्यासाठी रोज शेकडो लहान मुलं आपल्या पालकांसोबत येत असतात.

सुमित सोनकांबळे देखील आपल्या आजोबासोबत खेळण्यासाठी उद्यानात गेला होता. मात्र, खेळता खेळता  सायंकाळी सहा वाजन्याच्या सुमारास त्याला एका सापाने दंश केला. दंश केल्याने त्याला उपचारासाठी वाशीतील मनपा दवाखान्यात नेण्यात आलं होतं. मात्र, दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूमुळे सोनकांबळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. सुमितच्या मृत्यूमुळे  पार्कमध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

साखरझोपेत असलेल्या दीड वर्षांच्या नातवाला आजीने विहिरीत फेकले

दरम्यान, एका आजीने आपल्या नातवाचा खून केल्याची घटना काही दिवसांपासून बारामतीतील इंदापूरमध्ये घडली होती. अखेर दीड महिन्यानंतर या वृद्ध महिलेला अटक करण्यात आली आहे.

बारामतीमधील इंदापूर तालुक्यातील आपल्या सासरवाडीत मुक्कामी राहिलेल्या दीड वर्षाच्या नातवाला ४ जानेवारी २०२० ला पहाटे ४.३० वाजता साखर झोपेत असतानाचा घरा शेजारील विहिरीत टाकून देऊन खून केला होता.  दीड महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपी महिलेला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  इंदापूर येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रवींद्र जराड हे त्यांची पत्नी गौरी आणि दीड वर्षाचा मुलगा, मयत वेदांत रवींद्र जराड यांच्यासह इंदापूर तालुक्यातील तनपुरवाडी, व्याहाळी इंदापूर इथं आपल्या सासरवाडीत ३ जानेवारी २०२० रोजी काही कामानिमित्त आले होते. रात्री बारामतीला घरी जायला उशीर झाल्याने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलासह आणि पत्नीसह तिथंच  मुक्कामी राहिले होते.

त्यानंतर ते झोपेत असताना पहाटे ४.३० वाजता  सासू सुलोचना सदाशिव तनपुरे  यांनी या लहान बाळाला घरा शेजारच्या पाणी असलेल्या विहिरीत टाकून दिले होते.

सकाळी ६ वाजता रवींद्र जराड हे झोपेतून उठले असता,  त्यांनी त्यांचा मुलगा वेदांत याचा शोध घेतला तेव्हा तो कुठेही दिसला नाही. त्यावेळी त्यांची सासु सुलोचना तनपुरे यांना विचारले असता, त्यांनी काहीच सांगितलं नाही, त्यानंतर त्यांनी शोधाशोध केली असता, त्यांनी शेजारील विहिरीजवळ गेले असता, विहिरीत पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं.

या प्रकरणानंतर मुलाच्या वडिलाने  इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या सासूविरोधात ४ जानेवारी २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आरोपी तनपुरे दीड महिन्यापासून फरारी झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी त्या इंदापूर तालुक्यातील व्याहळी येथील बस स्थानकावर येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून, महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने महिलेला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली. या महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार, अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक प्रवीण मोरे, महिला पोलीस हवालदार पी.जी.कांबळे यांनी केली.आरोपी महिलेस इंदापूर फौजदारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 07:00 PM IST

ताज्या बातम्या