मुंबई, 06 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवी व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) राज्याची राजधानी मुंबईमध्ये (mumbai) शिरकाव केला आहे. मुंबईमध्ये २ रुग्ण आढळून आले आहे. तर राज्यात एकूण रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ओमायक्रॅान रूग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्ण आढळून नये अशी प्रार्थना केली जात होती, पण अखेरीस मुंबईत दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जोहान्सबर्गहून मुंबईला आलेल्या 37 वर्षीय तरुण 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आला होता. त्याच्यासोबत त्याची अमेरिकेतील महिला मैत्रिणही होती. तिलाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. दोघांनी फायझरची लस घेतली आहे.
सततच्या टोमण्यांना कंटाळून तिने संपवलं आयुष्य; राहत्या घरी घेतला गळफास
सध्या दोघांनाही कोणतीही लक्षणे नाहीत. दोघांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांच्या संपर्कात आलेले 5 हायरिस्क व्यक्ती आणि 315 कमी जोखमीचे संपर्क ओळखले आहेत. तर याआधीच डोंबिवलीमध्ये ०१, पिंपरी चिंचवडमध्ये ०६, पुण्यामध्ये ०१ रुग्ण आढळून आला आहे.
'WHO'च्या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन
दरम्यान, कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (omicron) हा प्रकार आता सर्व जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, अद्याप हा विषाणू प्रकार इतर डेल्टा सारख्या प्रकारांपेक्षा वेगाने संक्रमित होतो की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. डब्ल्यूएचओकडून प्रारंभिक मूल्यांकनावर आधारित असे सांगण्यात आले आहे की, ओमिक्रॉन प्रकारात पुन्हा संसर्ग होण्याची अधिक क्षमता आहे. याचा अर्थ असा की ज्या लोकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण झाली आहे, त्यांना ओमायक्रॉन प्रकाराने संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. लोकांमध्ये ओमायक्रॉन प्रकाराबद्दल भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना प्रतिकारशक्ती मजबूत राखण्यावर भर द्यावा (strong immunity and omicron) लागणार आहे.
कोविडचे असे नवीन प्रकार किंवा उत्परिवर्तन समोर येत राहतील तोपर्यंत लोकांच्या मनात भीती राहील. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत Omicron प्रकाराची कोणतीही धोकादायक लक्षणे किंवा काहींना अचानक जास्त त्रास झाल्याची नोंद नाही. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळात अशा नवीन प्रकारांविरुद्ध कसे कार्य करेल याचा देखील कोणताही पुरावा नाही. अशा स्थितीत, कोरोना विषाणूच्या नव-नवीन प्रकारांशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राखणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.