Home /News /mumbai /

आज 160 किमी वेगानं दोन रेल्वे गाड्यांत होणार समोरासमोर टक्कर, रेल्वे मंत्रीही असणार ट्रेनमध्ये!

आज 160 किमी वेगानं दोन रेल्वे गाड्यांत होणार समोरासमोर टक्कर, रेल्वे मंत्रीही असणार ट्रेनमध्ये!

Railway Accident Testing: गेल्या काही वर्षांत रेल्वे जाळं पसरवण्यासोबतच विविध अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा कल राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून आज दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर होणार आहे.

    मुंबई, 04 मार्च: सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाचं प्रमुख साधन असणाऱ्या रेल्वेत सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे जाळं पसरवण्यासोबतच विविध अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा कल राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून आज दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर होणार आहे. ही एक चाचणी असून संबंधित एका रेल्वेत रेल्वे मंत्री उपस्थित असणार आहेत. तर दुसऱ्या रेल्वेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या चाचणीला 'कवच' चाचणी असं नाव देण्यात आलं आहे. ही कवच चाचणी सिकंदराबाद याठिकाणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद याठिकाणी दोन रेल्वेगाड्या विरुद्ध दिशेनं पूर्ण वेगानं एकमेकांच्या दिशेनं आणल्या जाणार आहेत. मात्र 'कवच' तंत्रज्ञानामुळे या गाड्यांची धडक होणार नाही. या गाड्यांचा वेग 160 किमी प्रतितास इतका असला तरी 'कवच' तंत्रज्ञानामुळे याचा वेग स्वयंचलित पद्धतीनं कमी होणार आहे. सनथनगर-शंकरपल्ली मार्गावरील प्रणालीच्या ट्रायल रनचा भाग म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सिकंदराबादला पोहोचणार आहेत. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर रेल्वे मंत्रालयानं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हेही वाचा-महिलेनं 1400 KM प्रवास करून लॉकडाऊनमध्ये मुलाला घरी आणलं; आता युक्रेनमध्ये अडकला भारतीय रेल्वेनं विकसित केलेलं हे कवच तंत्रज्ञान जगातील सर्वात स्वस्त स्वयंचलित ट्रेन टक्कर संरक्षण प्रणाली असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे लोको पायलटकडून एखादी चूक झाली तरी दुर्घटना टळणार आहे. 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील या तंत्रज्ञानाबाबत घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2000 किलोमीटर रेल्वेचं जाळं कवच तंत्रज्ञानाखाली आणलं जाणार आहे. आतापर्यंत दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये 1098 किलोमीटरहून अधिक मार्गावर आणि 65 लोकोमोटिव्हवर कवच बसवण्यात आलं आहे. हेही वाचा-Breaking News: फटाके बनवताना स्फोट, 7 जणांचा मृत्यू; 4 घरंही जमीनदोस्त झीरो अॅक्सीडेंटचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे तंत्रज्ञान रेल्वेची मदत करेल. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोको पायलटकडून चूक झाल्यास कवच प्रथम ऑडिओ-व्हिडिओद्वारे अलर्ट करेल. प्रतिसाद न मिळाल्यास ट्रेनमध्ये स्वयंचलित ब्रेक लावले जातील. यामुळे मोठा अपघात सहज टळणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Railway, Railway accident

    पुढील बातम्या