News18 Lokmat

पेट्रोलची 'हायटेक' चोरी करणारी टोळी जेरबंद

पेट्रोलपंपाला मायक्रोचीप्स लावून पेट्रोलची हायटेक चोरी करणारी टोळी जेरबंद, उत्तरप्रदेश आणि ठाणे पोलिसांची संयुक्त कारवाई

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 23, 2017 01:36 PM IST

पेट्रोलची 'हायटेक' चोरी करणारी टोळी जेरबंद

23 मे :पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पंपावर मायक्रो चिप्स चिटकवून ग्राहकाचे पेट्रोल चोरी करणारी टोळी ठाणे पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणातला मास्टरमाईंड विवेक शेट्टीला उत्तरप्रदेशातून तर अविनाश नाईक याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 110 माइक्रोचिप्स आणि 177 रिमोटसह ऑसिक्लोस्कोप आणि प्रोग्रामामर हस्तगत करण्यात आला आहे.

27 एप्रिल रोजी युपीच्या एसटीएफ पथकाने लखनऊ येथील 7 पेट्रोलपंपावर छापा मारल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तब्बल दहा वर्षे हा पेट्रोल चोरीचा धंदा सुरु होता. शेट्टी आणि नाईक हे पेट्रोल पंप मालकाला ३ हजार रुपयात ही चीप्स विकायचे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी उच्चशिक्षित आहेत. ग्राहकांनी एक लीटर पेट्रोलची किंमत मोजूनही त्यांना फक्त 940 ते 950 एमएल पेट्रोलच मिळत होतं. म्हणजे लीटरमागे 50 ते 60 एमएल पेट्रोलची चोरी होत होती. त्यातून एका पेट्रोल पंपावर दररोज 40 ते 50 हजार रुपयांची वरकमाई होत होती तर महिन्याकाठी हीच रक्कम 12 ते 15 लाख रुपयांच्या घरात जात होती यावरून हा घोटाळा किती मोठा हे सहज  तुमच्या लक्षात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2017 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...