मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

2 तासाचे 2 लाख! मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक बाब उघड

2 तासाचे 2 लाख! मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक बाब उघड

ही अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये झळकली आहे, तर दुसऱ्या मॉडेलने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

ही अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये झळकली आहे, तर दुसऱ्या मॉडेलने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

ही अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये झळकली आहे, तर दुसऱ्या मॉडेलने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 21 ऑगस्ट : पॉर्न केस प्रकरण मावळत असताना सेक्स रॅकेट (Sex racket)संदर्भातील एक मोठी बातमी शुक्रवारी समोर आली. मुंबईच्या क्राइम (Mumbai Crime News) ब्रान्चने एक टॉप मॉडेल आणि एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला जुहूमधील फाइव्ह स्टार हॉटेलमधून पकडल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र तपासानंतर या दोघांना अटक केलं नाही, तर रेस्क्यू केल्याचं सांगितलं. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालाही अटक करण्यात आली आहे. सीनियर इंस्पेक्टर मनीष श्रीधनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा खान हिने चौकशीदरम्यान सांगितलं की, हे सेक्स रॅकेट ती गेल्या अनेक वर्षांपासून चालवत होती. पोलिसांना इशा खानबद्दल टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी टीमला जुहू येथील एका हॉटेलमध्ये धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती. क्राइम ब्रान्चने असा केला प्लान इशा खानची माहिती मिळताच तातडीने क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला. यामध्ये त्याने टॉप मॉडल्सची मागणी केली. यानंतर इशा खानने त्यांना अनेक फोटो व्हाॉट्सअॅप केले. क्राइम ब्रान्चने यापैकी दोन फोटो सिलेक्ट केले. यामधील एक अभिनेत्री अनेक जाहिरातीत झळकली आहे तर दुसरीने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. हे ही वाचा-  रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला 2 तासाचे दोन लाख इशा खानने एका तरुणीसाठी दोन तासाचे दोन लाख रुपये असल्याचं सांगितलं. या दोन लाख रुपयात खानला 50 हजार रुपये दिले जातात. तर तरुणींना दीड लाखांची रक्कम दिल्याचं सांगितलं जात आहे. क्राइम ब्राम्चने मॉडेल, अभिनेत्रीसह दलालांना केलं अरेस्ट खोटे ग्राहक बनून पोलीस अधिकाऱ्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये एक रुम बुक केला. गुरुवारी रात्री महिला दलाल, मॉडेल आणि अभिनेत्री जशा हॉटेलमध्ये पोहोचल्या. क्राइम ब्रान्चच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये काय म्हणाल्या मॉडेल आणि अभिनेत्री? मॉडल आणि टीवी अभिनेत्रीने सांगितलं की, कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे त्या या व्यवसायत आल्या.

First published:

Tags: Crime news, Lockdown, Mumbai, Sex racket

पुढील बातम्या