मुंबई, 13 जून : मुंबईत (Mumbai Rain) आज पावसाने विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान खात्याकडून सध्या ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. काही ठिकाणी पावसामुळं साचलेलं पाणी अजूनही आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आज दोन महिला आणि एका वाहन चालकाला वाचवण्यात यश आलं.
दोन महिला आणि एक वाहनचालक ४ फूट पाण्यात अडकून पडल्याचे पोलिसांना (Mumbai Police) माहिती मिळाली होती. त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच कर्तव्यावरील पोलीस जवानांनी तातडीनं घटनास्थळी पोहचून त्या तिघांचीही सुटका केली. त्यांची घरी जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. या घटनेची मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करून माहिती देण्यात आली.
मुंबई पोलीस दल बचाव कार्यात नेहमीच आघाडीवर असते, हे अनेक घटनांनवरून समोर आले आहे. आजही अशाच प्रकारे एका घटनेत वाहनात अडकून पडलेल्या तिघांची पोलिसांनी सुटका केली.
मुंबई पोलिसांचे कार्य- 'अ क्लास अपार्ट'!
दोन महिला व एक वाहनचालक ४ फूट पाण्यात अडकून पडल्याचे कळताच कर्तव्यावरील पोलीस जवानांनी त्यांची सुटका केली व त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली.#AamhiDutyVarAhot — Mumbai Police (@MumbaiPolice) June 13, 2021
दरम्यान, आज मुंबई, ठाणे (Thane), पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीचे ढग दक्षिणेकडे वळल्याने मुंबईचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट मध्ये बदलला आहे. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy rainfall) हवामान विभागानं वर्तवला आहे.
हे वाचा - जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख जिओना चाना यांचं निधन; कुटुंबात 38 बायका आणि 89 मुले
हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड वर काल पाणी भरल्याने 4 तास रस्ते वाहतूक ठप्प होती.
हे वाचा - तुम्हीही बँकेत FD केली असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकतं नुकसान
हवामान विभागाने जाहीर केलेल्या अलर्टनुसार, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी रविवार, सोमवारी रेड अलर्ट आहे. 13 जून 2021 रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर सोमवारी जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News, Mumbai police, Mumbai rain