हार्बरच्या प्रवाशांचे हाल सुरूच; आज आणि उद्या हार्बरवर पुन्हा मेगाब्लॉक

हार्बरच्या प्रवाशांचे हाल सुरूच; आज आणि उद्या हार्बरवर पुन्हा मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Share this:

27 डिसेंबर : हार्बर रेल्वेमागचं शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाहीये. हार्बर मार्गावरील बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर चालणाऱ्या ६०४ फेऱ्यांपैकी ३४ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत.

मध्य रेल्वेने घेतलेल्या ४८ तासांच्या ब्लॉकमध्ये सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेस बेलापूरहून सुटणाऱ्या आठपैकी सात फेऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन तर एक लोकल वाशीहून सुटणार आहे. सायंकाळच्या वेळेस पाच लोकल पनवेलपर्यंतच चालविल्या जातील. एक लोकल वाशीपर्यंत चालेल आणि दोन लोकल रद्द करण्यात येतील. गर्दी नसतानाच्या कालावधीतील ६५ फेऱ्यांपैकी ३१ फेऱ्या रद्द केल्या जाणार असून, १८ फेऱ्या पनवेलपर्यंत चालविल्या जातील. ४ फेऱ्या नेरुळपर्यंत, १० फेऱ्या वाशी आणि दोन फेऱ्या मानखुर्दपर्यंत चालतील. या ब्लॉकचा ट्रान्सहार्बर रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.

नेहमीच्या कामांमुळे आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवाशांना ही हार्बर नेहमी रडवते असंच म्हणावं लागेल. रोजच्या कामांमुळे प्रवाशांचे आणि नोकरदार वर्गाचे खूप हाल होतात. त्यात आता पुन्हा दोन दिवस मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

 

First Published: Dec 27, 2017 09:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading