Home /News /mumbai /

BREAKING : mansukh hiren death case प्रकरणी 2 जणांना अटक, महाराष्ट्र ATS ची मोठी कामगिरी

BREAKING : mansukh hiren death case प्रकरणी 2 जणांना अटक, महाराष्ट्र ATS ची मोठी कामगिरी

मनसुख हिरेन प्रकरणी ATS ने शनिवारी चौकशीला बोलावलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

  मुंबई, 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे खळबळ उडाली असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (mansukh hiren death case) 2 जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र एटीएसच्या (ATS) पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्यात आला आहे. पण, त्याआधीच मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र एटीएएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं अद्याप समोर आली नाही. Param Bir Singh Letter: अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत उपस्थित केला सवाल मनसुख हिरेन प्रकरणी ATS ने शनिवारी चौकशीला बोलावलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  या करता शनिवारी दिवसभर चौकशी सुरू होती आणि त्यानतंर रात्री देखील या दोन व्यक्तींची चौकशी सुरू होती.  एक माजी पोलीस अधिकारी आणि एक सामान्य व्यक्ती आहे. तर आज सकाळी 9 च्या सुमारास या दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती ATS ने दिली आहे. या दोघांच्या अटकेमुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ उकलले जाणार आहे. त्यामुळे एटीएस पथक काय खुलासा करतो हे पाहण्याचे ठरणार आहे. त्या चूकीसाठी आमिर खान आजही मागतो माफी; राणी मुखर्जीनं सांगितला भन्नाट किस्सा विशेष म्हणजे, या प्रकरणाचा पुढील तपास हा एनआयए तपास यंत्रणा करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल करावा, असे आदेश दिले आहे. या बद्दल गृहमंत्रालयाने याबद्दल नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: मुंबई पोलीस

  पुढील बातम्या