अबू सालेमच्या लग्नाच्या मनसुब्यावर पाणी, पोलीस आयुक्तांनी नाकारला पॅरोल

अबू सालेमच्या लग्नाच्या मनसुब्यावर पाणी, पोलीस आयुक्तांनी नाकारला पॅरोल

कुख्यात गुंड अबु सलेमचा पॅरोल अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी फेटाळला आहे. 5 मे रोजी लग्न करण्यासाठी तळोजा जेलला अर्ज केला होता, त्यानं लग्न करण्यासाठी आणि होणाऱ्या पत्नीसोबत राहण्यासाठी 45 दिवसांचा पॅरोल मागितला होता.

  • Share this:

21 एप्रिल : कुख्यात गुंड अबु सलेमचा पॅरोल अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी फेटाळला आहे. 5 मे रोजी लग्न करण्यासाठी तळोजा जेलला अर्ज केला होता, त्यानं लग्न करण्यासाठी आणि होणाऱ्या पत्नीसोबत राहण्यासाठी 45 दिवसांचा पॅरोल मागितला होता. त्याच्या पत्नीचे नाव कौसर बहार असून याच संदर्भात पोलीस कौसर आणि तिच्या परिवाराची चौकशी देखील करणार होते.

अबू सलेमनं आपल्या अर्जात म्हटलं होतं की तो 12 वर्ष, 3 महिने आणि 14 दिवस तुरुंगात आहे. त्यात त्यानं एक दिवसही रजा घेतली नव्हती.

1991मध्ये सलेमचं पहिलं लग्न झालं होतं. त्याला दोन मुलं आहेत. ती सध्या अमेरिकेत आहेत. मोनिका बेदीबरोबरच्या त्याच्या संबंधांचीही चर्चा होती. तो सध्या मुंबई बाँबस्फोटाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.

First Published: Apr 21, 2018 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading