1993 मुंबई ब्लास्ट प्रकरणी टाडा कोर्ट आज निकाल देण्याची शक्यता

1993 मुंबई ब्लास्ट प्रकरणी टाडा कोर्ट आज निकाल देण्याची शक्यता

  • Share this:

29 मे : मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेम आणि इतरांविरोधात विशेष टाडा कोर्ट आज निकाल देण्याची शक्यता आहे.

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. तर एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.

या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूमच्या विरोधात  सीबीआयने चार्जशीट दाखलं केली आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केलं असून ते दोषी आहेत की नाही, हे विशेष टाडा न्यायालय आज स्पष्ट करणार आहे.

दरम्यान, या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

दुसरीकडे कोर्टाने अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. संजय दत्त ही शिक्षा भोगून आता बाहेर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2017 09:47 AM IST

ताज्या बातम्या