कटात सहभागी नव्हता तर शस्त्रास्त्रं नेली कशी ?, कोर्टाने अबू सालेमला फटकारलं

कटात सहभागी नव्हता तर शस्त्रास्त्रं नेली कशी ?, कोर्टाने अबू सालेमला फटकारलं

आपण शस्रासं कशाकरता नेतोय याची माहिती सालेमला नसणं शक्यच नाही असं मतही कोर्टाने नोंदवलंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

11 जुलै : अबू सालेमला जर कटकारस्थानाबद्दल काही माहिती नव्हतंच तर त्यानं मग शस्रास्रं नेलीतच कशी असा सवाल मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने अबू सालेमला केला. आपण शस्रासं कशाकरता नेतोय याची माहिती सालेमला नसणं शक्यच नाही असं मतही कोर्टाने नोंदवलंय.

१९९३ च्या साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणी आज विशेष टाडा कोर्टात अबू सालेमचा बचाव त्याचे वकील सुदीप पासबोला यांनी केला त्यावेळेस कोर्टाने हा सवाल विचारला. मुंबईत होणाऱ्या बाॅम्बस्फोटांची सालेमला कोणतीच कल्पना नव्हती तो त्या मोठ्या कटात सामील नव्हता, त्यानं शस्रास्रं मुंबईत आणली आणि त्याकरता या प्रकरणातील इतर आरोपींना जी शिक्षा झाली तसाच विचार सालेमचा व्हावा असा युक्तीवाद सालेमचे वकील पासबोला यांनी केला.

सालेमप्रमाणेच दोषी ठरवण्यात आलेल्यांना ८ वर्षांची शिक्षा झाली आहे, सालेमनं तर १५ वर्ष तुरुंगात काढली आहेत त्यामुळे त्याची मुक्तता करण्यात यावी असंही पासबोला यांनी सालेमच्या युक्तीवादात म्हटलं. ज्याप्रमाणे विज्ञानात एकसारखेपणा असता तसाच तो निकालात असावा असंही पासबोला यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं. सालेमला फाशीचा प्रश्नच उद्भवत नाही, जन्मठेपही नको असं पासबोला यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं.

सीबीआयनं आपल्या युक्तीवादात सालेमला फाशीची शिक्षा योग्य राहील पण भारतीय गुन्हेगार प्रत्यर्पण कायद्यातील ३४ क या कलमामुळे जन्मठेप मागावी लागत असल्याचं म्हटलं होतं. पासबोला यांनी आपल्या युक्तीवादात जेलमधून आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार सालेमचं तुरुंगातील वर्तन चांगलं असल्याचा दाखला यावेळी दिला.

सालेम या कटात सामील असलेले मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा, मुस्तफा डोसा, अनिस इब्राहिम यांच्या संपर्कात नव्हता, त्यानं बाॅम्बस्फोटाच्या कटकारस्थानाच्या बैठकींमध्ये सहभाग घेतला नव्हता, त्याच्या विरोधात तसे आरोपही नाहीत आणि त्याचा तसा कबुलीजबाबही नाही असंही पासबोला यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं.

तसंच या फरार झाला म्हणून या कटकारस्थानात सालेम हा महत्वाची भूमिका असा सीबीआयचा दावा योग्य नसून तो आदेश देणारा नव्हता तर तो आदेशाचं पालन करणारा होता असाही पासबोला यांनी युक्तीवाद केला.

First published: July 11, 2017, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading