आई-वडिलांपासून जीव वाचवा...; प्रेमात पडलेल्या 19 वर्षीय प्रियांकाची हायकोर्टात याचिका!

आई-वडिलांपासून जीव वाचवा...;  प्रेमात पडलेल्या 19 वर्षीय प्रियांकाची हायकोर्टात याचिका!

जन्म देणाऱ्या आई-वडिलांपासून स्वत:चा आणि प्रियकराचा जीव वाचवण्यासाठीची एका अजब याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

  • Share this:

मुंबई, 07 मे: जन्म देणाऱ्या आई-वडिलांपासून स्वत:चा आणि प्रियकराचा जीव वाचवण्यासाठीची एका अजब याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुण्याजवळच्या नवलाख उंबरे गावाची रहिवासी असलेल्या एका तरुणीने ही याचिका केली होती. संबंधित तरुणीची याचिका दाखल करुन घेत न्यायालयाने पोलिसांना तिच्या सुरक्षेचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण

नवलाख उंबरे या गावातील 19 वर्षीय प्रियांका शेटे या तरुणीचे विराज अवघडे या तरुणावर प्रेम आहे. पण आंतरजातीय प्रेमाला आणि विवाहाला प्रियांकाच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. त्यामुळेच तिने स्वत:च्या आई-वडिलांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रियांकाने दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर झाली. प्रियांकाने याचिकेत स्वत:चा आणि प्रियकर विराजचा जीव वाचवावा अशी विनंती न्यायालयाला केली होती.

विराज हा मातंग समाजातील असल्यामुळे प्रियांकाच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला होता. कुटुंबीयांचा प्रेम व लग्नाला विरोध असल्यामुळे संरक्षण देण्याची मागणी प्रियांकाने याचिकेत केली होती. या विरोधापोटी काही दिवस घरात डांबून ठेवण्यात आले होते. ज्यांनी मला डांबले त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई करावी अशी मागणी प्रियांकाने केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांना प्रियांकाची तक्रार दाखल करुन घेण्यास सांगितले आहे. तसेच दोघांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.

मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार

कुटुंबीयांनी केलेल्या विरोधामुळे मी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मी सज्ञान आहे. आयुष्य कोणासोबत जगायचे हे ठरवण्याचा मला अधिकार आहे. विराज अवघडे गरीब असला तरी मी त्याच्यासोबत आनंदात राहीन, असे देखील प्रियांकाने याचिकेत म्हटले होते.

VIDEO : तुला फिरवीन गाडीवर, वरातीत तब्बल 63 नवरदेवांचा साॅलिड डान्स

First published: May 7, 2019, 8:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading