मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ज्यांना रक्षणासाठी ठेवलं त्यांनीच केला घात; 2 सुरक्षा रक्षकांकडून 19 वर्षीय तरुणाची चाकूनं भोसकून हत्या

ज्यांना रक्षणासाठी ठेवलं त्यांनीच केला घात; 2 सुरक्षा रक्षकांकडून 19 वर्षीय तरुणाची चाकूनं भोसकून हत्या

Murder in Thane: मीरा भोईंदर याठिकाणी एका सोसायटीचं रक्षण करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनी (two security guards) सोसायटीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाची चाकू भोकसून हत्या (19 year old boy stabbed to death) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

ठाणे, 29 मे: मीरा भोईंदर याठिकाणी एका सोसायटीचं रक्षण करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनी (two security guards) सोसायटीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाची चाकू भोकसून हत्या (19 year old boy stabbed to death) केली आहे. मृत मुलाचा संबंधित सुरक्षा रक्षकांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा राग मनात धरून आरोपी सुरक्षा रक्षकांनी या मुलाची चाकू भोकसून हत्या केली आहे. मुलाला रक्तबंबाळ झाल्याचं पाहून सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. याप्रकरणी काशी मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

संबंधित घटना ही मीरा रोडच्या सृष्टी सेक्टर 1 मध्ये घडली आहे. तर मृत मुलाचं नाव अभिषेक सिंग असून तो केवळ 19 वर्षांचा होता. अभिषेक आपल्या कुटुंबासह संबंधित सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राहायचा. अभिषेक हा सिंग दाम्पत्यासाठी एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एक मुलाची किरकोळ कारणातून हत्या केल्यानं सोसायटीतील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत अभिषेक याचा काही दिवसांपूर्वी आरोपी सुरक्षा रक्षक सुभाष पांडे आणि अजित तिवारी यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

हे ही वाचा-प्रियकराच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास विवाहितेनं दिला नकार; दगडाने ठेचून हत्या

त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरक्षा रक्षक आणि मृत अभिषेक यांच्यांत खुन्नस सुरू होती. हा राग सुरक्षा रक्षकांच्या मनात खदखदत होता. दरम्यान काल (28 मे) रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास मृत अभिषेक आणि संबंधित सुरक्षा रक्षकांत पुन्हा वाद झाला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अभिषेकच्या पोटात चाकू भोकसून हत्या केली. अभिषेकला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच अभिषेकच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक रहिवाशांनी अभिषेकला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण आज सकाळी साडे नऊच्या सुमारास अभिषेकने अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा-मुंबईत प्रेमी युगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा; दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ

याप्रकरणी मृत अभिषेकच्या वडिलांनी काशी मीरा पोलीस ठाण्यात सुभाष पांडे आणि अजित तिवारी या दोन सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार असून काशी मीरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  एकुलत्या एक मुलाची अशाप्रकारे हत्या झाल्यानं सिंग कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

First published:

Tags: Murder, Thane