Home /News /mumbai /

नवी मुंबईतील आयटी कंपनीतून आली धक्कादायक बातमी, आरोग्य प्रशासन हादरलं

नवी मुंबईतील आयटी कंपनीतून आली धक्कादायक बातमी, आरोग्य प्रशासन हादरलं

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

एकाच कंपनीतील 19 जणांना लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून आयटी कंपनीतील इतर कामगारांची आता कोरोना चाचणी होणार आहे.

    नवी मुंबई, 22 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहे. परंतु, नवी मुंबईतील महापेमधील एका आयटी कंपनीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या कंपनीत  19 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. मिलेनियम बिझनेस पार्कमधील आय क्लाऊड आयटी कंपनीत 19 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.  या कंपनी व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केली होती. त्यात 19 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले.  यातील 19 पैकी 7 कामगार नवी मुंबईतील राहणारे आहे. या सर्व 19 कामगारांवर वाशीतील मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहे. हेही वाचा -'Corona ची लागण किंवा मृत्यूचं भय नाही पण...', कोरोना योद्धांनी मांडली व्यथा एकाच कंपनीतील 19 जणांना लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून आयटी कंपनीतील इतर कामगारांची आता कोरोना चाचणी होणार आहे. संचारबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार कंपनीत आले कसे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या कंपनीवर आता संचारबंदीचे उल्लघंन   केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. मुंबई कोरोनाबाधितांचा आकडा लाखाच्या घरात जाणार! दरम्यान,  महाराष्ट्रात कोरोनाचे 4 हजार 669 रुग्ण आहेत. यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. दरम्यान, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाच सदस्यीय टीमने असा अंदाज वर्तवला आहे की, मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42 हजार 604 कोरोना प्रकरणांची नोंद होईल. तर, हा आकडा 15 मेपर्यंत 6 लाख 56 हजार 407वर जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची गणिती मॉडेलिंगच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली. हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये हॅकिंगची भीती वाढली, WhatsAppच्या सुरक्षेसाठी वापरा हे फीचर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीला एकत्र केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 13 हजार 636 व्हेंटिलेटर आणि 4 लाख 83 हजार आयसोलेशन बेडचा अभाव असेल. त्यामुळे येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास राज्य सरकारपुढे मोठ्या समस्या असण्याची शक्यता आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या