• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ठाणे पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट', अवघ्या 4 तासांत 170 आरोपींना केलं गजाआड

ठाणे पोलिसांकडून 'ऑपरेशन ऑल आऊट', अवघ्या 4 तासांत 170 आरोपींना केलं गजाआड

Crime in Thane: शहरातील गुन्हेगारी थांबवायचं पोलिसांनी मनावर घेतलं, तर काय केलं जाऊ शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. ठाणे पोलिसांनी अवघ्या चार तासांत एकूण 170 आरोपींना गजाआड केलं आहे.

 • Share this:
  ठाणे, 13 नोव्हेंबर: दिवसेंदिवस महाराष्ट्रातील बड्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित शहरातील पोलीस प्रशासनावर स्थानिक नागरिकांकडून टिकाही केली जाते. पण शहरातील गुन्हेगारी थांबवायचं पोलिसांनी मनावर घेतलं, तर काय केलं जाऊ शकतं याचा प्रत्यय नुकताच आला आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) अवघ्या चार तासांत एकूण 170 आरोपींना गजाआड (170 accused arrested in just 4 hours) केलं आहे. ठाणे पोलीस अचानक अॅक्शन मोडमध्ये आल्यानं परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री 9 वाजता ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात 'ऑपरेशन ऑल आऊट' (Operation All Out) राबवलं आहे. या कारवाईत ठाणे पोलिसांनी अवघ्या चार तासांत शहरातील एकूण 170 आरोपींना आणि संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 152 पोलीस अधिकारी तर 834 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. एकाच वेळी अचानक सुरू झालेल्या ऑपरेशमुळे बेसावध असलेल्या अनेक सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. हेही वाचा-पोलिसांत तक्रार दिल्याचा घेतला विचित्र बदला; पीडितेच्या घरात घुसून विकृत कृत्य गुरुवारी रात्री 9 वाजता सुरू झालेलं ऑपरेशन ऑल आऊट शुक्रवारी रात्री 1 वाजता संपलं आहे. दरम्यानच्या चार तासांत ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाचा परिसर पिंजून काढला आहे. परिसरातील अनेक आरोपींसह इतरही गोष्टींची देखील झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, गर्दुल्यांचा वावर असलेली ठिकाणं, गुन्हेगारी वस्त्या आणि संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी केली आहे. यावेळी पोलिसांनी तडीपार, फरारी आणि सराईत आरोपींची झाडाझडती घेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. हेही वाचा-बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण यावेळी पोलिसांनी बेकायदेशीर सुरू असलेल्या धंद्यावरही छापे टाकले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 170 जणांना अटक केली आहे. यामध्ये तडीपार, सराईत गुन्हेगारांसोबत संशयित गुन्हेदारांचा देखील समावेश आहेत. पोलिसांनी अचानक राबवलेल्या 'ऑपरेशन ऑल आऊट'मुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: