Home /News /mumbai /

Mumbai: रेल्वेची साखळी खेचूनही नाही वाचला जीव, एक्स्प्रेसच्या दारात बसलेल्या तरुणीचा दुर्दैवी शेवट

Mumbai: रेल्वेची साखळी खेचूनही नाही वाचला जीव, एक्स्प्रेसच्या दारात बसलेल्या तरुणीचा दुर्दैवी शेवट

Accident in Mumbai: डोंबिवलीनजीक (Dombivli) असणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पवन एक्स्प्रेसमधून आपल्या आई-वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

    डोंबिवली, 25 मार्च: डोंबिवलीनजीक (Dombivli) असणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पवन एक्स्प्रेसमधून आपल्या आई-वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित तरुणी पवन एक्स्प्रेसच्या दारात बसून उलटी करत असताना, अचानक चक्कर येऊन ती धावत्या ट्रेनमधून खाली पडली (Minor girl fall down from express train) आहे. यावेळी तिच्या आई वडिलांनी तात्काळ साखळी खेचून रेल्वे थांबवली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी संबंधित मुलीला तातडीने उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केलं आहे. शीतलकुमारी साहनी असं मृत पावलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहे. ती बिहार राज्यातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी आहे. हेही वाचा- महिला डॉक्टरचा लॉजमध्ये भयावह शेवट, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत शीतलकुमारी साहनी आपल्या आई वडिलांसोबत पवन एक्स्प्रेसने प्रवास करत होती. दिवा कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. उलटी आल्याने ती एक्स्प्रेसच्या दारात बसून उलटी करू लागली. पण यावेळी तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. धावत्या रेल्वेतून तरुणी खाली पडल्याने आई वडिलांचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने तात्काळ साखळी खेचून रेल्वे थांबवली. हेही वाचा- Beed: अमानुष छळानंतर विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, सासरच्यांकडून क्रूरतेची हद्द पार यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या लोहमार्ग पोलिसांना त्यांनी सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी त्वरित तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Dombivali, Mumbai, Train accident

    पुढील बातम्या