Home /News /mumbai /

शिंदे सरकार येताच बंडखोर आमदाराचे काम झालं, सरनाईकांच्या प्रकल्पाला 150 कोटींची मंजुरी

शिंदे सरकार येताच बंडखोर आमदाराचे काम झालं, सरनाईकांच्या प्रकल्पाला 150 कोटींची मंजुरी

या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर केला आहे.

या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर केला आहे.

या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर केला आहे.

    ठाणे, ०७ जुलै : आम्हाला निधी मिळत नव्हता, आमची काम होत नव्हती, अशी टीका करत शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले होते. आता शिंदे सरकार (shinde government) स्थापन झाल्यानंतर बंडखोर आमदारांच्या कामाला मुहुर्त मिळत आहे. आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnaik ) यांनी पाठपुरावा केलेल्या नागला बंदर खाडी किनारा विकसित (Nagla Bandar Gulf Coast Developed) करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात 5 कोटी निधी सुद्धा मंजूर केला आहे. ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा लाभला आहे. या खाडी किनाऱ्याचा विकास व्हावा ही काळाची गरज आहे. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनार्याचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने होण्याकरिता खाडी किनाऱ्यांचे सुशोभिकरण करणे गरजेचे असल्याने घोडबंदर रोडवरील नागला बंदर खाडी किनारा विकसित केला जावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे केली होती. अखेर घोडबंदर रोडवरील नागला बंदर हा खाडी किनारा साैंदर्यीकरण करून तेथे आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यासाठी शासनाकडून आराखडा बनविण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या साैंदर्यात भर टाकण्यासाठी हा खाडी किनारा सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जवळपास १५० कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्यात राज्य सरकारने ५ कोटी रुपये टोकन रक्कम म्हणून निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. महाराष्ट्र सरकारच्या "महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास“ या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या कामात प्रकल्प खर्चाचा ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर २५ टक्के हिस्सा महानगरपालिकेचा राहणार आहे. आमदार सरनाईक यांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घोडबंदर रोडवरील नागला बंदर खाडी किनार्यावर जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. खाडी किनार्या जवळची जागा मेरी टाइम बोर्डाची असून लवकरात लवकर खाडी किनारा विकसित करण्याचे काम जागेवर सुरु व्हावे, अश्या प्रकारची सुचना प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खाडी किनारा विकसित होत असताना त्यात आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्याचे देखील प्रस्तावित आहे. खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे "आरमार केंद्राची“ प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला, इतिहासप्रेमींना करून दिली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले. शिवकालीन नागला बंदर किल्ला या खाडी जवळच आहे. तेथून जवळच असलेल्या घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण झाले असून या ठिकाणी "शिवसृष्टी“ उभारण्याचे कामही याच वर्षात सुरु होणार आहे. तसेच दळण-वळणाच्या दृष्टीने नागला बंदराला लागूनच ४० मिटरचा रस्ता बनविण्याचे कामही सुरू आहे. या कामासाठी ५ कोटी रक्कम मंजूर केल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या