परीक्षा सुरू होण्याआधी दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, नवी मुंबईतील घटना

परीक्षा सुरू होण्याआधी दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, नवी मुंबईतील घटना

सायली वर्गात आल्यानंतर ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. तिचे हृदय बंद पडले. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट- दहावीची चाचणी परीक्षा सुरू होण्याआधीच एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. सायली अभिमान जगताप (14) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. सायली वर्गात चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. तिचे हृदय बंद पडले. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अभ्यासाच्या ताणामुळे सायलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तुर्भे येथील आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते अभिमान जगताप यांची ती मुलगी आहे.

मिळालेली माहिती अशी की, सायलीची मंगळवारी दहावीची चाचणी परीक्षा होती. परीक्षेसाठी ती शाळेत गेली. दप्तर ठेवण्यासाठी ती वर्गातून बाहेर आली होती. त्याच वेळी ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सायलीची प्रकृती ठीक होती, शिवाय ती कसल्याही मानसिक तणावात नव्हती, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. यामुळे शाळेत चक्कर येऊन पडण्यामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, नातेवाइकांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले असता, त्यातही संशयास्पद असे काही दिसले नसल्याचे नातेवाईक यशपाल ओहोळ यांनी सांगितले. सायलीच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा करण्यासाठी बुधवारी शवविच्छेदन केले जाणार आहे.

पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

Published by: Sandip Parolekar
First published: August 14, 2019, 9:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading