मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नववीत शिकणाऱ्या मुलीला देह विक्रीत ढकलण्याचा होता डाव, पोलिसांनी अशी केली सुटका

नववीत शिकणाऱ्या मुलीला देह विक्रीत ढकलण्याचा होता डाव, पोलिसांनी अशी केली सुटका

कोरोनाच्या महामारीमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. असात वेश्या व्यवसायाच्या एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी 3 महिलांसह 10 जणांना या प्रकरणात अटक केली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. असात वेश्या व्यवसायाच्या एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी 3 महिलांसह 10 जणांना या प्रकरणात अटक केली आहे.

दलालाने आणखी एका मुलीची व्यवस्था करत 45 हजारांची मागणी केली. सोबतच त्याने मुलीचा फोटोही पाठवला.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 15 मार्च : मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची देह विक्रीच्या व्यवसायातून सुटका केली आहे. मुंबई गुन्हे शाखेनं  या प्रकरणी एका तरुणीला आणि पुरुषाला अटक केली आहे. 9 व्या वर्गात शिकत असणाऱ्या या चिमुरडीचा व्यवहार करत असताना रंगेहाथ पकडलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी अकबर पठाण यांना एका खबऱ्याकडून काही लोकं हे गोरेगावमधील ऑबेरॉय मॉलमध्ये एका अल्पवयीन मुलाची देहविक्री करणार अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि एक बनावट ग्राहकाच्या वेशात पोलिसांनी दलालाशी फोनवर संवाद साधला. फोनवरच या मुलीचा 30 हजार रुपयात सौदा झाला. बनावट ग्राहकाने दलालाकडे मुलीचे ओळखपत्र मागितलं असता त्यांनी तिच्या शाळेतील ओळखपत्र आणि फोटो मोबाईलवर पाठवला.

त्यानंतर बनावट ग्राहकाने आणखी एका मुलीची मागणी केली. त्यानंतर दलालाने आणखी एका मुलीची व्यवस्था करत 45 हजारांची मागणी केली. सोबतच त्याने मुलीचा फोटोही पाठवला. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पैसे घेऊन मुली ताब्यात देण्याचं ठरलं होतं.

त्यानुसार, दलाल मुलीला घेऊन गोरेगावमधील ऑबेरॉय मॉलच्या समोर ए.के. वैद्य मार्गावर एका मारुती स्विफ्ट कारमध्ये आला. पोलिसांनी आधीच या परिसरात सापळा रचला होता. कार तिथे पोहोचताच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह आणखी दोन तरुणीची सुटका केली. पोलिसांनी दलालाला ताब्यात घेतलं.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दलाल आणि देहविक्रीसाठी आलेल्या तरुणींच्या चौकशीतून समोर आलं की, 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी ही 9 व्या वर्गात शिकते.  या दोन्ही तरुणींना पैशाचे आमिष देऊन जबरदस्तीने देह विक्री करण्यासाठी आणलं होतं.

अटक करण्यात आलेल्या दलालाचं नावं तुषार चंद्रकांत आणि एका 25 वर्षीय तरुणी आहे. हे दोघेही विरार इथं राहणार आहे.

दोघांविरोधात दिंडोळी पोलीस स्टेशमध्ये  गु.र.क्र.138/2020 भादंवी कलम 370(3), 372, 34 आणि  बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार  गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी कार जप्त करण्यात आली असून पुढील तपास हा दिंडोशी पोलीस करत आहे.

First published: