मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /धक्कादायक! मोबाइलवर गेम खेळताना आई ओरडली; रागाच्या भरात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या

धक्कादायक! मोबाइलवर गेम खेळताना आई ओरडली; रागाच्या भरात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या

भिवंडीत टीव्ही पाहात असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडीत टीव्ही पाहात असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडीत टीव्ही पाहात असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

    भिवंडी, 18 एप्रिल: सध्या कोरोनाचे संकट असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करून घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे घरात राहून कुटुंब टीव्ही किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र, याच दरम्यान भिवंडी शहरा (Bhiwandi City)तून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई ओरडली म्हणून एका 15 वर्षीय मुलीने कथितपणे आत्महत्या (15 year old girl allegedly commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

    टीव्ही पाहात असताना मोबाइलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने (Mother stop her to playing game on mobile) 15 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यू टावरे कंपाऊंड इथं घडली आहे. कोमल (वय 15 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती घरामध्ये टीव्ही लावून मोबाइलवर गेम सुद्धा खेळत होती. हे तिची  आई रेखा हिने पाहिले असता कोमल हिच्यावर आई रागावली.

    वाचा: 50 वर्षांवरील नागरिकांना घरी उपचार घेण्यास मनाई, नवी मुंबई पालिकेचा निर्णय

    आई आपल्यावर रागावल्याने रागाच्या भरात ती पहिल्या मजल्यावर जाऊन घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून कथितपणे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिचा मृत्यू झाला होता.

    मृतक तरुणीचा मृतदेह खाली उतरवून इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मुलीच्या आईची कोणतीही तक्रार नसल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या मुले घरीच असल्याने मोबाइलच्या जास्त आहारी जात असल्याने पालकांमध्ये हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

    First published:
    top videos

      Tags: Bhiwandi, Suicide