Home /News /mumbai /

संतापजनक! मुंबईत पाण्याच्या बाटलीसाठी दुकानदाराला जबर मारहाण; 15-20 जणांनी काठीने केले वार, VIDEO

संतापजनक! मुंबईत पाण्याच्या बाटलीसाठी दुकानदाराला जबर मारहाण; 15-20 जणांनी काठीने केले वार, VIDEO

मुंबईला लागून असलेल्या काशीमीरा परिसरात मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी पान दुकान मालक आणि त्याच्या कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली (Mumbai Crime News).

    मुंबई 08 एप्रिल : मुंबईला लागून असलेल्या काशीमीरा परिसरात मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी पान दुकान मालक आणि त्याच्या कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली (Mumbai Crime News). या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) समोर आला असून यात पान दुकानदाराला केलेली मारहाण स्पष्टपणे दिसत आहे. काही लोक या पान विकणाऱ्या व्यक्तीला अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मारहाण करणाऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल. ती एक चूक! BMC च्या धडकी भरवणाऱ्या XE रिपोर्टबाबत काही तासातच मोदी सरकारकडून सर्वात मोठी अपडेट फैजान अन्सारी असं काठीने मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो काशीमीरा परिसरात पानाचे दुकान चालवतो. फैजान अन्सारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दुकानातून दररोज महापालिकेत काम करणारे कर्मचारी पाण्याच्या बाटल्या आणि इतर काही सामान उधारीवर घेतात. मात्र काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या ठेकेदाराने दुकानदाराला सांगितलं की, कोणालाही उधारीवर सामान देऊ नको. जो कोणी उधारी घेईल, त्याचे पैसे त्याच्याकडूनच घे. मी कोणत्याही कर्मचाऱ्याचे उधारीचे पैसे देणार नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे सफाई कर्मचारी त्याच्या दुकानावर पाण्याची बाटली घेण्यासाठी आले. यावेळी फैजानने त्यांना उधारीवर पाण्याची बाटली देण्यास नकार दिला. याच कारणामुळे भडकलेल्या 15-20 कर्मचाऱ्यांनी फैजान अन्सारी आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण कऱण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात काही लोक फैजान आणि त्याच्या कुटुंबीयांना काठीने जबर मारहाण करताना दिसत आहेत. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात नियमावली जाहीर, वाचा सविस्तर पीडित फैजान अन्सारीच्या तक्रारीनंतर, काशी मीरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 143,145,147,149, 324 अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात पुरावे गोळा करून पोलीस लवकरच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करतील.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Mumbai News, Shocking video viral

    पुढील बातम्या