मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात बदल; आतापर्यंत 334 निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात बदल; आतापर्यंत 334 निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कार्यभार आधी दिपक वसावे यांच्याकडे होता. पण मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळामुळे हा पदभार डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई,17 ऑगस्ट: तीन डेडलाईन निघून गेल्या तरी अजूनही मुंबई विद्यापीठाच्या सगळे निकाल अजूनही जाहीर झालेले नसतानाच आता परीक्षा आणि मुल्यमापन विभागात काही बदल करण्यात आले आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर अर्जुन घाटुळे यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कार्यभार आधी दिपक वसावे यांच्याकडे होता. पण मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळामुळे हा पदभार डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. अर्जुन घाटुळे हे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात परीक्षा नियंत्रक आहेत.

मुंबई विद्यापीठाचे आतापर्यंत एकूण 334 निकाल जाहीर झाले आहेत. कला शाखेचे 131 निकाल, वाणिज्य शाखेचे 16, विज्ञान शाखेचे 27, व्यवस्थापन शाखेचे 25 निकाल, तसंच तंत्रशिक्षण 134 आणि विधी विभागाचा एक निकाल जाहीर झालाय.एकूण 477 विभाग असून अजूनही 143 निकाल जाहीर होणे बाकी आहे.

तर दुसरीकडे कुलगुरू संजय देशमुख कुठे आहेत असा संतप्त सवालही विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 02:10 PM IST

ताज्या बातम्या