सर्वसामन्यांचे जेवण महागणार! गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांनी वाढ, असे आहेत मुंबईतले आजचे दर

सर्वसामन्यांचे जेवण महागणार! गॅस सिलिंडरच्या किमतीत 145 रुपयांनी वाढ, असे आहेत मुंबईतले आजचे दर

आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस किमती या 145 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना 829.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर, दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता 144.50 रुपयांनी वाढून 858. 50 रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये 149 रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या 881 रुपये झाल्या आहेत.

वाचा-वुहानमध्ये अडकलेल्या साताऱ्याच्या तरुणीच्या मदतीसाठी पृथ्वीराज चव्हाण सरसावले

वाचा-मुंबईकरांना घरबसल्या पैसे मिळवण्याची नवी संधी; कचऱ्यातून पालिका देणार पैसे

वाचा-सोन्याची झळाळी उतरली, मंगळवारचे भाव इथे पाहा

वाचा-टाटा-अदानी ट्रेन चालवण्याच्या रेसमध्ये! 100 मार्गांवर धावणार खासगी ट्रेन

सरकार 12 सिलिंडरवर अनुदान देते

सध्या सरकार एका घरात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोचे 12 सिलिंडर्स अनुदान देते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला बाजारभावाने खरेदी करावी लागेल. सरकार दरवर्षी 12 सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान असले तरी याची किंमत देखील दरमहा महिन्यात बदलत असते. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटक अनुदानाची रक्कम निश्चित करतात.

First published: February 12, 2020, 9:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या