मुंबई, 06 डिसेंबर: मुंबईच्या (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. झोका खेळत असताना 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला (Minor girl died while playing on swing) आहे. क्षणभराचा आनंद तिच्या जीवावर बेतला आहे. रविवारी सायंकाळी घराच्या पोटमाळ्यावर साडीचा झोका बाधून खेळत असताना हा अपघात (Swing Accident) घडला आहे. अपघाताची ही घटना समोर येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे.
अपघाताची घटना घडल्यानंतर संबंधित मुलीला कुटुंबीयांनी तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असतानाच 13 वर्षीय मुलीची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-जीवापेक्षा ब्लाऊज ठरला महत्त्वाचा; स्वत:ला खोलीत कोंडून घेत महिलेची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय मृत मुलगी धारावीतील राजीव गांधी नगर परिसरातील रहिवासी होती. रविवारी सायंकाळी ती नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या पोटमळ्याला साडीने बांधलेल्या झोक्यावर खेळत होता. झोका खेळत असताना अचानक तिचा तोल गेला. तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला असता, साडीचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला गेला. त्यामुळे तिला मदतही मागता आली नाही. गळ्याभोवती फास घट्ट झाल्याने तिची शुद्ध हरपली.
हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य
मुलीला फास बसल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीनं तिला खाली उतरवलं आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असतानाच संबंधित मुलीची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai