मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत HIVग्रस्त बापाकडून सावत्र मुलीसोबत विकृतीचा कळस; दररोज करायचा घृणास्पद कृत्य

मुंबईत HIVग्रस्त बापाकडून सावत्र मुलीसोबत विकृतीचा कळस; दररोज करायचा घृणास्पद कृत्य

Rape on Minor in Mumbai: मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका एचआयव्हीग्रस्त 45 वर्षीय नराधमाने आपल्या 13 वर्षीय सावत्र मुलीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 09 फेब्रुवारी: मुंबईतील (Mumbai) आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका एचआयव्हीग्रस्त 45 वर्षीय नराधमाने आपल्या 13 वर्षीय सावत्र मुलीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित मुलीला धमकी देत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार (HIV infected step father raped minor daughter) केले आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी सावत्र मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. पीडित मुलीनं अखेर ही बाब आपल्या ओळखीतील एका महिलेला सांगितल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी नराधम बापाविरोधात बाललैंगिक अत्याचारसह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सोमवारी आरोपी बापाला अटक (Accused step father arrested) केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपी बाप हा एचआयव्हीग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलीस आणि डॉक्टर पीडित मुलीचं समुपदेशन करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय पीडित मुलगी आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटपाथवर आई, सावत्र पिता आणि मोठ्या बहिणीसोबत राहते. तिच्या आईला देखील एचआयव्ही आहे. दरम्यान आरोपीनं 14 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगू नकोस असं म्हणत धमकावलं आहे. त्यामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित मुलगी सावत्र बापाचा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. भररस्त्यात पत्नीवर चाकूनं सपासप वार; डोंबिवलीतील थरकाप उडवणारी घटना, कारण समोर अखेरी आरोपीचा सतत होणारा त्रास सहन न झाल्यानं पीडित मुलीनं संबंधित प्रकार आपल्या ओळखीतील एका 32 वर्षीय महिलेला सांगितला आहे. त्यानंतर संबंधित महिला पीडित मुलीला घेऊन पोलिसांकडे गेली. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास आझाद मैदान पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Mumbai

पुढील बातम्या