लैंगिक अत्याचारातून 13 वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, पालकांची गर्भपातासाठी न्यायालयात धाव

लैंगिक अत्याचारातून 13 वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, पालकांची गर्भपातासाठी न्यायालयात धाव

बुधवारी चारकोप परिसरातील एका १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती २७ आठवड्यांची गर्भवती असल्याची बाब उघड झाली. या घटनेमुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला असून बुधवारी त्यांनी बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 आॅगस्ट : मुंबईतील चारकोप परिसरात राहाणाऱ्या 13 वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून अनोळखी आरोपीविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, तिच्या पालकांनी गर्भपातासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारतात २० आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने आतापर्यंत मुंबईतील ९ गर्भवतींनी सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताच्या परवानगीसाठी धाव घेतली आहे. यापैकी सात महिलांनाच गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर दोन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातास नकार दिला होता.

त्यानंतर बुधवारी चारकोप परिसरातील एका १3 वर्षांची अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती २७ आठवड्यांची गर्भवती असल्याची बाब उघड झाली. या घटनेमुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला असून बुधवारी त्यांनी बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

First published: August 11, 2017, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading