महाराष्ट्रात 30 हजारांहून जास्त अपघात, 12 हजार नागरिकांनी गमवला जीव

महाराष्ट्रात 30 हजारांहून जास्त अपघात, 12 हजार नागरिकांनी गमवला जीव

नुकत्याच 20 च्या उंबरऱ्यावर आलेली अर्चना पारठे हिचा एका अपघातात मृत्यू झाला होता.

  • Share this:

मुंबई,20 डिसेंबर: राज्यात गेल्या 11 महिन्यांत 30 हजाराहून जास्त अपघात झाले आहेत. जवळपास 12 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी असला ही गंभीर बाब आहे.

दरम्यान, नुकत्याच 20 च्या उंबरऱ्यावर आलेली अर्चना पारठे हिचा एका अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताल जबाबदार होता मद्यधुंद कारचालक. ही  घटना मुंबईतील चुनाभट्टी परिसरात मागच्या आठवड्यात घडली होती. पण रोजच कुठल्या ना कुठल्या ठिकाणी असा हकनाक बळी जातो आहे.

महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर या काळात एकूण 30 हजार 80 अपघात झाले. मागच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये अपघाताचा आकडा 32 हजार 499 एवढा होता. तर यावर्षी 11 महिन्यांच्या काळात 11 हजार 387 लोकांचा मृत्यु झालाय. जे मागच्या वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी कमी आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत रस्त्यावर होणाऱ्या या अपघातांच प्रमाण हे 7 टक्क्यानी कमी असलं तरी हा आकडा आणखी कमी व्हावा, यासाठी परिवहन आयुक्तांनी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक टीम बनवली आहे. ही टीम अपघतानंतर त्या ठिकाणी पोहचून त्या जागेचे सर्वेक्षण करुन तिथली माहिती परिवहन आयुक्तालयाला कळवते. या टीमने केलेल्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की. रॅश ड्रायव्हिंगमुळे म्हणजेच बेदरकारपणे गाडी चालवल्याने सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक अपघात हे राज्य हायवेवर झाले आहेत. पण महत्त्वाची बाब म्हणजे या साडेचार महिन्यांच्या कालावधीत सगळ्यात कमी अपघात मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर झाले असले तरी त्यातील मृत्युदर हा 6 पट अधिक आहे.

दगड अंगावर पडून तीन मजुरांचा जागीच मृत्यू..

दरम्यान, रत्नागिरीजवळ मावळंगे गावाजवळ चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन मजूर ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घरबांधणीसाठी लागणाऱ्या जांभा दगडांची वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मावळंगे गावाजवळ उलटला. ट्रकमध्ये भरलेल्या चिऱ्यांवर बसलेल्या तीन मजुरांचा दगडांखाली दबून जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने जखमीना बाहेर काढण्यात आले. अजय लाखण, सुधाकर लाखण, गोरक्षक काळे अशी मृतांची नावे आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 20, 2019, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading