11वी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

काल संपूर्ण दिवस प्रक्रिया बंद ठेवल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा ती पुन्हा सुरू होणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2017 09:45 AM IST

11वी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

22 जून : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या गोंधळात आज, गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. काल संपूर्ण दिवस प्रक्रिया बंद ठेवल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा ती पुन्हा सुरू होणार आहे.

आज सकाळी 10 वाजल्यापासून या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. वेबसाइटचा गोंधळ आजही कायम राहिल्यास त्याचा थेट फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार असून संपूर्ण वेळापत्रकातच बदल करण्याची वेळ शिक्षण उपसंचालक कार्यालयावर येणार आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरुवातीला 16 जूनपासून ही आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली होती. पण क्षमता कमी असल्यानं सर्व्हर डाऊन झालं होतं. दहावीत जवळजवळ दीड लाख विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यामुळे आता हे सर्व्हर वाढवले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 09:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...