11वी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर

11वी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर

नियोजित वेळापत्रकानुसार ती आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार होती. मात्र प्रत्यक्षात ती काल रात्रीच जाहीर करण्यात आली होती.

  • Share this:

20 जुलै : 11वी प्रवेशाची दुसरी यादी वेळेआधीच जाहीर करण्यात आलीय. नियोजित वेळापत्रकानुसार ती आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार होती. मात्र प्रत्यक्षात ती काल रात्रीच जाहीर करण्यात आली होती.

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करताना मोठा घोळ झाला होता. ही यादी जाहीर व्हायला मध्यरात्र झाली होती. त्यामुळे शिक्षण विभागाला पालक आणि विद्यार्थ्यांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं होतं. मात्र ती चूक दुसरी यादी जाहीर करताना त्यांनी दुरूस्त केलीय.

त्यामुळे उशीरा का होईना पण शिक्षण विभागाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केल्याने विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...