मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत 11 खाजगी शाळांना शिक्षण नियंत्रण विभागाची नोटीस, मान्यता रद्द करण्याचा इशारा

मुंबईत 11 खाजगी शाळांना शिक्षण नियंत्रण विभागाची नोटीस, मान्यता रद्द करण्याचा इशारा

आरटीई अर्थात राईट टू एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या मुंबईतील 11 खाजगी शाळांना शिक्षण नियंत्रण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : आपल्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्याआधी ही बातमी बघा. आरटीई अर्थात राईट टू एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या मुंबईतील 11 खाजगी शाळांना शिक्षण नियंत्रण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मान्यता रद्द करण्याचा इशारा शाळा प्रशासनाला देण्यात आला आहे.

    शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शुल्काची प्रतिपूर्ती न झाल्यामुळे अनेक खासगी शाळांनी हे प्रवेश रोखले आहेत. त्यामुळे या प्रक्रियेअंतर्गत प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय. २५ टक्के कोट्याद्वारे खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत शाळांना दिली जाते. मात्र २०१४-१५ सालापासून या विद्यार्थ्यांची फी शाळांना मिळालीच नाही.

    कुठल्या शाळांना मिळाली नोटीस ?

    द स्कॉलर हायस्कूल

    द अ‍ॅक्टिव्हिटी हायस्कूल

    एड्यू ब्रिज इंटरनॅशनल स्कूल

    पोदार आर्ट इंटरनॅशनल हायस्कूल

    डी. वाय. पाटील स्कूल

    सरस्वती मंदिर सीबीएसई स्कूल

    द सोशल सर्व्हिस लीग सीबीएसई स्कूल

    शिरोडकर हायस्कूल सीबीएसई स्कूल

    आयईएस ओरायन

    चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटी

    ताराबाई मोडक इंग्रजी माध्यम

    First published:

    Tags: 'राईट टू एज्युकेशन', Notice, Right to education, School, नोटीस, शाळा