• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • कोरोना काळात भूमाफिया फोफावले! मुंबईत एका वर्षात जवळपास 10 हजार अनधिकृत बांधकामं

कोरोना काळात भूमाफिया फोफावले! मुंबईत एका वर्षात जवळपास 10 हजार अनधिकृत बांधकामं

कोरोना महामारीच्या काळात (Coronavirus Pandemic) मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियाची लॉटरी निघाली आहे. एकीकडे जवळपास सर्व कामधंदे बंद असताना दुसरीकडे कोरोना महामारीचा फायदा उचलून जवळपास 10 हजारांच्या घरात अनधिकृत बांधकामं केली आहेत.

  • Share this:
मुंबई, 09 मार्च: कोरोना काळात प्रत्येक क्षेत्राला काहीना काहीतरी फटका बसला आहे. बांधकाम व्यवसाय अद्यापही काही समस्यांचा सामना करत आहे. दरम्यान या काळात काही भूमाफियांनी मात्र त्यांची पोळी भाजून घेतली आहे. कोरोना महामारीच्या काळात (Coronavirus Pandemic) मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियाची लॉटरी निघाली आहे. एकीकडे जवळपास सर्व कामधंदे बंद असताना दुसरीकडे कोरोना महामारीचा फायदा उचलून भूमाफियांनी 25 मार्च 2020  पासून 25 फेबुवारी 2021 पर्यंत तब्बल 9558 अनधिकृत बांधकाम केली. ही माहिती मुंबई महानगरपालिकेनीच दिली आहे. ज्यात स्पष्टपणे पालिका या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात अपयशी ठरल्याच अधोरेखित होत आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण व निर्मुलन शहरे कार्यालयकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती की, ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर अनधिकृत बांधकामाबाबत किती तक्रारींची नोंद झाली? किती अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्यात आली?  यावर पालिकेने दिलेली माहिती धक्कादायक आहे. (हे वाचा-VIDEO: नियम न पाळल्यास अंशतः लॉकडाऊनचा करण्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा) महिती अधिकारात समोर आलेल्या या माहितीनुसार 25 मार्च 2020 पासून 28 फेबुवारी 2021 पर्यंत ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर एकूण अनधिकृत बांधकामाच्या 13325 तक्रारींची नोंद झाली आहे. ज्यातील दुबार तक्रारी  3767 आहेत. त्या वगळल्यास 9558 इतकी मुंबईत अनधिकृत बांधकाम झाली आहेत पैकी फक्त  466 अनधिकृत बांधकामावर निष्कासन म्हणजेच तोडक कारवाई करण्यात आली आहे. यातील सर्वात जास्त तक्रारी 3251 या एकट्या एल वॉर्ड म्हणजे कुर्ल्यात झाल्याची नोंद आहे अनधिकृत बांधकामांबाबत केलेल्या तक्रारी आणि कारवाईची विभागनिहाय माहिती -ए विभागात  एकूण 32 तक्रार, 8 दुबार तक्रार, 24 अनधिकृत बांधकाम,  फक्त 1 निष्कासन कारवाई. -बी विभागात एकूण 368 तक्रार, 186 दुबार तक्रार, 182 अनधिकृत बांधकाम, फक्त 2 निष्कासन कारवाई. -सी विभागात एकूण 614 तक्रार, 225 दुबार तक्रार, 389 अनधिकृत बांधकाम, फक्त 24 निष्कासन कारवाई. -डी विभागात एकूण 151 तक्रार, 73 दुबार तक्रार, 78 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 निष्कासन कारवाई. -ई विभागात एकूण 579 तक्रार, 143 दुबार तक्रार, 436 अनधिकृत बांधकाम, तसेच एकही  निष्कासन कारवाई झाली नाही . -ई-उत्तर विभागात एकूण 148 तक्रार, 58 दुबार तक्रार, 90 अनधिकृत बांधकाम, फक्त 9 निष्कासन कारवाई. -एफ दक्षिण विभागात एकूण 297 तक्रार, 83 दुबार तक्रार, 214 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 निष्कासन कारवाई. -जी उत्तर विभागात एकूण 203 तक्रार, 23 दुबार तक्रार, 180 अनधिकृत बांधकाम, फक्त 7 निष्कासन कारवाई. -जी दक्षिण विभागात एकूण 212 तक्रार, 90 दुबार तक्रार, 122 अनधिकृत बांधकाम, फक्त 15 निष्कासन कारवाई. (हे वाचा-'अमित शहा खुनी है'च्या घोषणांनी सभागृहात राडा, सत्ताधारी आणि भाजप आमनेसामने) -एच पूर्व विभागात एकूण 451 तक्रार, 219 दुबार तक्रार, 232 अनधिकृत बांधकाम, फक्त 11 निष्कासन कारवाई. -एच पश्चिम विभागात एकूण 525 तक्रार, 96 दुबार तक्रार, 429 अनधिकृत बांधकाम, फक्त 21 निष्कासन कारवाई. -के पूर्व  विभागात एकूण 441 तक्रार, 46  दुबार तक्रार, 395 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 निष्कासन कारवाई. -के पासकजीम विभागात एकूण 342 तक्रार,  40 दुबार तक्रार, 302 अनधिकृत बांधकाम, फक्त 58 निष्कासन कारवाई. -एल विभागात एकूण 3251 तक्रार, 1249 दुबार तक्रार, 2002 अनधिकृत बांधकाम, फक्त 52 निष्कासन कारवाई. -एम पूर्व विभागात एकूण 1194 तक्रार, 20  दुबार तक्रार, 1174 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 निष्कासन कारवाई. -एम पश्चिम विभागात एकूण 1213 तक्रार, 526 दुबार तक्रार, 687 अनधिकृत बांधकाम, फक्त 33 निष्कासन कारवाई. -एन विभागात एकूण 280 तक्रार, 40 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई. -पी उत्तर विभागात एकूण 429 तक्रार, 87 दुबार तक्रार, 342 अनधिकृत बांधकाम, फक्त 62 निष्कासन कारवाई. -पी दक्षिण विभागात एकूण 416 तक्रार, 183 दुबार तक्रार, 233 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई. -आर उत्तर विभागात एकूण 595 तक्रार, 90 दुबार तक्रार, 505 अनधिकृत बांधकाम, फक्त 14 निष्कासन कारवाई. -आर दक्षिण विभागात एकूण 348 तक्रार, 34 दुबार तक्रार, 314 अनधिकृत बांधकाम,  सर्वात जास्त 75 निष्कासन कारवाई. -आर मध्य विभागात एकूण 398 तक्रार, 202 दुबार तक्रार, 196 अनधिकृत बांधकाम, फक्त 4 निष्कासन कारवाई. -एस विभागात एकूण 589 तक्रार, 37 दुबार तक्रार, 552 अनधिकृत बांधकाम, फक्त 8 निष्कासन कारवाई. -टी विभागात एकूण 249 तक्रार, 9 दुबार तक्रार, 240 अनधिकृत बांधकाम, फक्त 3 निष्कासन कारवाई. (हे वाचा-रेल्वेने बंद केले सर्व Emergency Number; आता या एकाच हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार) आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते "शिवसेनेने बदलेच्या भावनेमध्ये अभिनेत्री कंगना रणौतच्या अनधिकृत कामावर ज्या तत्परतेने कारवाई केली तशीच तत्परता महानगरपालिका  मुंबईतील लाखो अनधिकृत बांधकामाबाबत कधी दाखवणार? मुंबई महानगरपालिका पोलीस बंदोबस्त तसेच इतर साधनांनवर प्रत्येक वर्षी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करतात. परंतु बेकायदेशीर बांधकाम / इमारतीवर निष्कासन कारवाई  केली जात नाही. मुंबई महानगरपालिक अवैध बांधकामावर दरवर्षी 15,000 पेक्षा अधिक फक्त नोटीस बजावते, पण 10 ते 20% अवैध बांधकामावर निष्कासन कारवाई केली जाते. काही अवैध बांधकामावर बोगस कारवाई केली जाते. महापालिका आयुक्तांनी बेकायदेशीर बांधकामासाठी जबाबदार किती अधिकाऱ्याना निलंबित केले आहे का?' पालिकेचे अधिकारी या अनधिकृत बांधकामांना अभय देतात का, असा सवाल यावेळी उपस्थित राहतो आहे. दरम्यान यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे की 'अवैध बांधकामांना कोणी अभय देत नाही. मुंबईतली ही बांधकामं वेगळ्या जागांवर झालेली आहेत. या जागा मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत. जसं की, जिल्हाधिकारी जागा, बीपीटीची जमीन, म्हाडाची जागा, एसआरएची जागा  आणि इथे पालिकेला कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने या बांधकामाना नुसतं अभयचं मिळत नाहीत तर ती फोफावतात. म्हणूनच आम्ही या संदर्भात एक मीटिंग घेतली जिथे आम्ही एक सरकारला प्रपोजल दिलेल आहे की एक अशा जमिनींवर कारवाई करण्यासाठी पालिका तयार आहे पण त्या संदर्भातले कारवाईचे जे काही दर असतील ती त्या त्या प्राधिकरणाने पालिकेला द्यावे म्हणजे पालिका तोडक  कारवाई ही योग्य रित्या करू शकेल.'
Published by:Janhavi Bhatkar
First published: