शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यावर सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक 'मातोश्री'वर !

भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिले आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिले आहे.

  • Share this:
मुंबई, 21 जून :  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँम्बमुळे (pratap sarnaik letter) पुन्हा एकदा राज्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) युती होणार का याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. हिंगणघाटमधील भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे. एकीकडे भाजपचे नेते युती होणार असे उघडपणे संकेत देत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवली आहे. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिले आहे. गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा  बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. ‘फास्ट अँड द फ्युरियस’मधील गाड्यांचा लिलाव; त्याच्या स्पर्शामुळं 4 कोटींना विकली आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील (hinganghat nagar parishad) उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहे. हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे, असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.

पोलीस आणि चोर आमनेसामने, एक चूक अन् चोरटे पळाले, LIVE VIDEO

काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये सुद्धा शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला होता. जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation)  महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक (BJP Corporator) सेनेत खेचून आणले होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता. विशेष म्हणजे, जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी आणि राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर होती. पण  महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेनं राजकीय सर्जिकल स्ट्राईक करत उद्धवस्त केले होते.
Published by:sachin Salve
First published: