अंधेरीतील साकिनाका भागात घरावर झाड कोसळले, 1 ठार, 2 जखमी

अंधेरीतील साकिनाका भागात शुक्रवारी दुपारी एका घरावर झाड कोसळून 1 जण ठार झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 02:27 PM IST

अंधेरीतील साकिनाका भागात घरावर झाड कोसळले, 1 ठार, 2 जखमी

मुंबई. 2 ऑगस्ट- अंधेरीतील साकिनाका भागात शुक्रवारी दुपारी एका घरावर झाड कोसळून 1 जण ठार झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या एका घटनेत चांदिवलीत म्हाडा कॉलनीतच बिल्डिंग क्रमांक 1 इथे घराची भिंत पडली आहे. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली 3 जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, बीएमसी स्टाफ आणि पोलिस दाखल झाले. जवानांनी तिघांना ढिगाऱ्या खालून सुखरुप बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईत संरक्षक भिंत कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी मालाडमधील राणी सती मार्गावर देखील पालिकेच्या जलाशयाची 20 फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपड्यांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 21 जणांचा झोपेतच मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सात बालके आणि सहा महिलांचा समावेश होता.

कसारा घाट रस्ता खचला...

जोरदार पावसामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जवळपास 100 मीटर लांब रस्त्यावर खोल भेगा पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

मुसळधार पावसामुळे कसारा घाट खचला असून मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुना कसारा घाटातील काही भाग खचलाय. जुन्या कसारा घाटातील वाहतूक एकेरी मार्गावर सुरू असून, रस्ता खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट लावून काम सुरू आहे. दरवर्षी घाटात या ठिकाणी रस्ता खचतो असे सांगण्यात येत आहे. जवळपास 8 ते 25 फूट खोल या भेगा असून, ऐन दरीच्या तोंडावर असलेल्या रिटेनिंग वॉलला जोडून हा रस्ता खचल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Loading...

पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली, मायलेक थोडक्यात बचावले

पुण्यातील गणेश पेठेत ढोर गल्लीत बोरा हॉस्पिटलजवळ मध्यरात्री जुन्या वाड्याची भिंत कोसळली. भिंत पडत असल्याचे वेळीच लक्षात येताच दुदैवाने मायलेकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात काही भागात धोकादायक वाडे आहेत. बहुतांश वाड्यांच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे त्यात लोक राहत आहेत.

VIDEO: मुंबईत पावसाची पुन्हा दमदार हजेरी, अंधेरी सबवेमध्ये साचलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...