मुंबईत सिलिंडरचा ब्लास्ट.. 1 ठार, 4 जखमी; 80 टक्के भाजली तरुणी

मुंबईत सिलिंडरचा ब्लास्ट.. 1 ठार, 4 जखमी; 80 टक्के भाजली तरुणी

जखमींपैकी ममता पवार ही 22 वर्षीय महिला सुमारे 80 टक्के भाजली आहे. तिची प्रकृची चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई,1 सप्टेंबर: घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर चाळ कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 22 वर्षाीय तरुणी सुमारे 80 टक्के भाजली गेली आहे. जखमींना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजू आनंद (वय-35) असे मृत महिलेचे नाव आहे. मालाड येथील एमएचबी वसाहतीत रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड मालवणी येथील भारत माता शाळेसमोरील चाळ क्रमांक 91 मध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की, त्यामुळे चाळ कोसळण्याची घटना घडली. मंजू आनंद यांच्या अंगावर भींत कोसळली. त्यांनी तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत शीतल काटे (44), सिद्देश गोटे (19) ममता पवार (22) व अश्विनी जाधव (26) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

ममता सुमारे 80 टक्के भाजली..

जखमींपैकी ममता पवार ही 22 वर्षीय महिला सुमारे 80 टक्के भाजली आहे. तिची प्रकृची चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे अश्विनी जाधव ही तरुणीही या दुर्घटनेत 15 टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर आहे.

जेलमध्ये कुख्यात गुंडाची बर्थडे पार्टी; केकसह मटणाचा बेत VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या