मुंबईत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक

हा २४ वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या वडिलांच्या फूड स्टॉलवर काम करत असल्याची माहिती उघड झाली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2017 12:02 PM IST

मुंबईत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक

मुंबई,13 ऑगस्ट: मुंबईतील १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा २४ वर्षीय आरोपी पीडित मुलीच्या वडिलांच्या फूड स्टॉलवर काम करत असल्याची  माहिती उघड झाली आहे.

13 वर्षांच्या पीडित मुलीचे आई-वडील मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता ती गर्भवती  असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी चारकोप  पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. या तरुणाला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शुक्रवारी त्याला दिंडोशी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या तरुणाला 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान ही अल्पवयीन मुलगी बुधवारपासून रिमांड होममध्ये आहे. ज्या दिवशी त्या मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली त्या दिवशीच मुलीच्या सुरक्षेसाठी चाईल्ड वेलफेअर कमिटीकडे सोपवण्यात आलं होतं. ती मुलगी अजूनही तिथंच आहे. चाईल्ड वेलफेअर कमिटी मात्र त्या मुलीला सोडत नाहीय. त्यांच्या गलथान कारभारामुळं ती मुलगी गेले चार दिवस रिमांड होममध्ये आहे. तिचा ताबा मिळवण्यासाठी तिचे पालक जंगजंग पछाडत आहेत.  दरम्यान मुलीच्या गर्भपातासंदर्भात आपण सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं तिच्या पालकांनी सांगितलंय.त्या मुलीनं खाणंपिणं देखील सोडलं आहे.

या साऱ्या प्रकारात तिचा काय दोष? असा संतप्त सवाल सगळीकडून विचारण्यात येतो आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 10:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...