• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • रवींद्र नाट्य मंदिराचा उडाला बोजवारा

रवींद्र नाट्य मंदिराचा उडाला बोजवारा

  • Share this:
अजय परचुरे,मुंबई 23 जुलै : मुंबईतल्या प्रभादेवी भागातलं एक प्रशस्त नाट्यगृह म्हणजे रवींद्र नाट्य मंदिर...पण या नाट्यगृहात सोयी सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्यानं कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात नाराजी पसरलीये. रवींद्र नाट्य मंदिरातलं कलाकारांसाठी असलेलं मेकअप रूम... पडझड झालेल्या भिंती, तुटलेल्या खुर्च्या आणि अस्वच्छ प्रसाधनगृह... मराठी नाटकांचे सर्रास प्रयोग होणार्‍या या नाट्यगृहात कलाकारांना अशा अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या नाट्यमंदिराची जबाबदारी ही राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याची आहे. पण, या नाट्यगृहाच्या देखभालीसाठी पुरेसा निधीच दिला जात नाही. अनेकवेळा पाठपुरावा करूनही उपयोग शून्य... नाट्यभूमीच्या पंढरीत जर ही दुरवस्था असेल तर हे सरकार समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी किती तत्पर आणि गंभीर आहे, याचीच प्रचिती येते.
First published: