मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सोमय्यांचा मोर्चा

सोमय्यांचा मोर्चा

20 जानेवारी : मोनिका मोरे अपघाताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढला. सोमय्यांनी घाटकोपर आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढला आणि फलाटांची पाहणी केली. लोकल डब्यांचा फूटबोर्ड आणि फलाटामधल्या अंतरामुळे घाटकोपर इथं मोनिकानं दोन्ही हात गमावले होते, तर कुर्ला स्टेशनला एका तरुणानं आपले दोन्ही पाय गमावले होते. अपघाताला कारणीभूत असणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली. रेल्वेच्या फलाटांची उंची वाढवावी आणि प्रवाशांच्या मागण्याही पूर्ण कराव्यात अशी मागणीही सोमय्यांनी केली.
First published:

Tags: Mumbai, Pune (City/Town/Village), Railway accident, Safety, Train accident, किरीट सोमय्या

पुढील बातम्या