मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सालेमवर छोटा शकीलने घडवून आणला हल्ला?

सालेमवर छोटा शकीलने घडवून आणला हल्ला?

chota shakil28 जून : 28 जून : गँगस्टर अबू सालेमवर तळोजा कारागृहात झालेल्या हल्ल्यामागे दाऊद गँगचा हात असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. दाऊद गँगचा खास मोरक्या छोटा शकीलने सालेमला मारण्याची सुपारी दिली असावी असा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी तुरुंग प्रशासन विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांनी सुरू केली असून बेजबाबदारपणा ठपका ठेवत कारागृहातील चार अधिकार्‍यांनी निलंबित करण्यात आलंय आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली. गुरूवारी रात्री 8.30 च्या सुमारास तळोजा कारागृहात अबू सालेमवर गोळीबार झाल्याची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली. अबू सालेमवर या अगोदरही जेलमध्ये हल्ला झाला होता. पण यावेळी तुरूंगात गोळीबारीचा प्रकार घडल्याने तुरूंगाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. पण याही पेक्षा तुरूंगाची सुरक्षा भेदून आतमध्ये रिव्हॉल्वर कशी नेण्यात आली याचा शोध आता घेतला जात आहे. सालेमवर नेपाळी गँगचा देवेंद्र जगताप ऊर्फ जेडीने गोळीबार केला. यात अबूच्या हाताला किरकोळ जखम झाली पण या हल्ल्यातून तो बालबाल बचावला. सालेमला मारण्यासाठी अगोदर प्लॅन रचन्यात आला होता. प्लॅनप्रमाणे एक महिन्या अगोदरच तुरूंगात रिव्हॉल्वर आणण्यात आली होती. जेडीने सालेमवर पहिली गोळी झाडली. त्यात त्याच्या हाताला गोळी चाटून गेली. पण दुसरी फायरिंग करताना रिव्हॉल्वर ब्लॉक झाली त्यामुळे सालेम या हल्लातून थोडक्यात बाचावला अशी माहिती सूत्रांनी दिली. अबूवर हल्लामागे 'डी'गँगचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या अगोदर अबू सालेमवर आर्थर रोड जेलमध्ये मुस्ताफ डोसाने धारधार चमच्याने हल्ला केला होता यात सालेमच्या चेहर्‍यावर जखमा झाल्या होत्या. या हल्ल्यानंतर सालेमची तळोजा तुरूंगात रवानगी करण्यात आली. मागिल महिन्यातच सालेमनं आपल्या जीवाला धोका असून दुसर्‍या तुरूंगात रवानगी करावी अथवा जामीन द्यावा असा अर्ज केला आहे. त्यावर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. पण प्रश्न असा निर्माण झाला की, सालेमने तुरूंगातून सुटका करून घेण्यासाठी आपल्यावर हल्ला करवून घेतला की, हल्ला झाला याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ठळक मुद्दे - गुरूवारी रात्री तळोजा तुरुंगात सालेमवर झाला हल्ला - देवेंद्र जगतापनं दोन राउंड फायरिंग केलं - पुन्हा फायरिंग करताना रिव्हॉल्वर ब्लॉक झालं - छोटा शकीलनं सालेमची सुपारी दिल्याचा संशय - छोटा शकील हा दाऊद गँगचा - एका महिन्यापूर्वी तुरुंगात रिव्हॉल्वर नेण्यात आलं होतं - सालेमवरच्या हल्ल्याची चौकशी सुरू - मीरा बोरवणकर यांनी सुरू केली चौकशी - मीरा बोरवणकर या तुरुंग प्रशासन विभागाच्या महासंचालक - जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार - गृहमंत्री हे चार अधिकारी निलंबित संजय साबळे - कॉन्स्टेबल चंद्रकांत पठारे नितीन सावंत गीतेश रणदिवे
First published:

Tags: अबू सालेम, छोटा शकील

पुढील बातम्या